Shivsena UBT : ठाकरेंच्या खासदारांमध्ये फूट अटळ; मात्र ऑपरेशन टायगरसाठी पुरेशी संख्या जमेना?

Maharashtra Alliance Politics: राज्यातील उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे समाधानी नसल्याचे बोलले जाते. त्यांना महायुती सरकारमध्ये अधिक मोठी भूमिका पार पाडायची आहे. त्या दृष्टीने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उद्धव ठाकरे यांच्या खासदारांचा गट फोडण्याचे टास्क दिल्याचे बोलले जाते.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde during his Delhi visit discussing political strategies, highlighting rising tension in Maharashtra politics.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 23 Mar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय आकांक्षा थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा त्या दृष्टीने चर्चेत आहे. त्यामुळे खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना आमिष दाखवण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत.

भाजपचा दिल्लीतील एक गट त्यासाठी डावपेच आखत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबईतील एका निष्ठावंत खासदारांनी उद्धव ठाकरेंना याबाबत अलर्ट केले. नाशिकच्या एका खासदाराने ही शिवसेना उद्धव ठाकरे यांना त्याची बातमी पुरविली. त्यामुळे उद्धव ठाकरे आता अधिक सतर्क झाले आहेत.

राज्यातील उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे समाधानी नसल्याचे बोलले जाते. त्यांना महायुती सरकारमध्ये अधिक मोठी भूमिका पार पाडायची आहे. त्या दृष्टीने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उद्धव ठाकरे यांच्या खासदारांचा गट फोडण्याचे टास्क दिल्याचे बोलले जाते.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Datta Meghe death : राजकारण-शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील मोठं नाव हरपलं! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात पाच खासदारांची उद्धव ठाकरे यांच्या काही खासदारांची त्यांचा थेट संपर्क झाल्याचे बोलले जाते. मात्र पक्षांतरासाठी अपेक्षित असलेली संख्या पूर्ण होण्यात अडचणी आहेत. त्यासाठी दोन खासदारांची गरज गरज असल्याचा दावा करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांना राज्यात आणि केंद्रात सत्तेत अधिक मोठा वाटा हवा आहे. संदर्भात त्यांनी वरिष्ठ स्तरावर तशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. सध्या मात्र केंद्रातील सरकार आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय समस्यांनी व्यस्त आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी त्यांना थांबण्याची सूचना केल्याचे कळते.

एकनाथ शिंदेंनी दिल्लीत सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरची माहिती एका निष्ठावंत खासदारांनी पक्षाचे नेत्यांना वेळेआधीच ठाकरेंना दिली. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अलर्ट झाले आहेत. त्यांनी याबाबत रविवारी खासदारांची बैठक घेतली.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Harshvardhan Sadgir : महाराष्ट्र केसरीची गदा जिंकताच हर्षवर्धन सदगीरचा धक्कादायक निर्णय; एकनाथ शिंदे अन् दादा भुसेंचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट

आता ठाकरेंच्या शिवसेनेतील मुंबईतील एक खासदार पूर्णवेळ खासदारांवर लक्ष ठेवणार आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत यांच्याशीही पक्ष प्रमुखांची चर्चा झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला त्यातून एक राजकीय दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com