Eknath Shinde Hospital Photo : हाताला सलाईन, समोर लॅपटॉप अन्....; रुग्णालयातील एकनाथ शिंदे यांचा पहिला फोटो आला समोर

Eknath Shinde Online Meeting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या रुग्णालयातील पहिला फोटो समोर आला आहे.
Eknath Shinde Hospital Photo
Eknath Shinde Hospital Photosarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी रात्री ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार आहे. अशक्तपणा आणि तापामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, रुग्णालयात असले तरी राज्यात पावसाळे होणाऱ्या अडचणींचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

रुग्णालयातून अधिकाऱ्यांची ते ऑनलाईन मिटींग घेत असल्याचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शिंदें यांच्या हाताला सलाईनचे कॅन्युला (IV) लावल्याचे दिसून असून त्यांच्या समोर लॅपटाॅप असल्याचे दिसत आहे. त्यांच्या खाटेच्या बाजुला असलेल्या टेबलावर काही औषधे आणि इंजेक्शन ठेवल्याचे देखील फोटोत दिसत आहे.

शिंदे रुग्णालयात शनिवारी दाखल झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले होते की, त्यांनी सांगितले होते की, उपमुख्यमंत्री शिंदें यांना 3 दिवस तिथेच (रुग्णालयात) राहावे लागेल. त्यांचा काश्मीर दौराही रद्द करण्यात आला आहे. रुग्णालयात असेल तरी त्यांनी राज्यातील पावसाचा आढाव घेतला. त्यांच्या स्वभावात शांत बसणे नाही.

Eknath Shinde Hospital Photo
Mumbai Rain News: मुंबईत रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

आराम करण्याचा सल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, सतत काम आणि झोपेचा अभाव, तसेच अतीताणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. त्यातच पावसाळी अधिवेशनात त्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्यांना ताप देखील आला होता. अखेर डाॅक्टरांनी त्यांना घरी उपचार घेण्यापेक्षा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच आराम करण्यास सांगितल होते.

Eknath Shinde Hospital Photo
Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, रुग्णलयातील मुक्काम वाढणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com