
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार अडचणीत येत असताना आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आमदार अडचणीत येण्याचे चित्र आहे. एका अभिनेत्रीनं त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. आमदार आणि एका व्यावसायिकांच्या विरोधात तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्री हेमांगी राव यांनी तक्रार दाखल केली आहे. भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा हेमांगी राव यांनी केला आहे.
पत्रकार परिषद घेत हेमांगी राव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. आता फडणवीस आणि शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
भूखंड लाटण्यासाठी शिंदेचे आमदार थोरवे यांनी गुंडगिरीचा वापर केल्याचा गंभीप आरोप त्यांनी केला आहे. थोरवे यांच्यावह बांधकाम विकसक दिपक वाधवा यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत. थोरवे आणि वाधवा यांच्या विरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आमची जमीन जबरदस्तीने मिळवण्यासाठी दिपक वाधवा यांना आमदार थोरवे हे मदत करीत आमच्या कुटुंबियांना धमकावत असल्याचे हेमांगी राव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत आम्ही चार वेळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी असहकार्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई-पुणे जुना महामार्गालगत खालापूर तालुक्यातील कांडरोली गावाच्या हद्दीत अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचे डॉक्टर पती विनोद राव यांची जमिन आहे. नवीमुंबई येथील व्यावसायिक विकासक दिपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता. काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. वाधवा ही जमिन बळजबरीने आणि दादागिरीचा वापर करत हस्तगत करत असल्याचा आरोप राव कुटुंबांने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.