Eknath Shinde in Kashmir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीरमध्ये, पर्यटकांच्या मदतीसाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ

Eknath Shinde Reaches Kashmir Support Tourists : एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे 83 पर्यटकांना विशेष विमानाने आज मुंबईत आणणार असल्याचे जाहीर केले.
 Eknath Shinde meets stranded tourists in Kashmir, assuring safety and coordination following the Pahalgam terror attack.
Eknath Shinde meets stranded tourists in Kashmir, assuring safety and coordination following the Pahalgam terror attack.sarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena : पहलगाम हल्ल्यामध्ये तब्बल 28 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. कश्मीरमध्ये गेलेले तब्बल दोन हजार पर्यटक अडकून पडले आहेत. या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी तसेच मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल (बुधवारी) रात्री कश्मीरमध्ये दाखल झाले. त्यांनी तेथे पर्यटकांची भेट घेत त्यांची आधार दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या मदतीसाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे 83 पर्यटकांना विशेष विमानाने आज मुंबईत आणणार असल्याचे जाहीर केले. तसेच आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था पर्यटकांसाठी केली जाणार असल्याचे सांगत परत आणण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या नावाची यादी देखील ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले.

 Eknath Shinde meets stranded tourists in Kashmir, assuring safety and coordination following the Pahalgam terror attack.
Ajit Doval: 'पहलगाम'च्या हल्ल्याला लवकरच करारा जवाब, अजित डोवालच करणार सर्जिकल स्ट्राईक 2.0 प्लॅन? PM मोदींनीच दिले संकेत

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

कश्मीरमध्ये दाखल झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी एअरपोर्टवर काही पर्यटकांना भेटलो. त्यानंतर हाॅटेलमध्ये देखील पर्यटकांना भेटलो. थकलेले, चिंताग्रस्त, पण दृढनिश्चयी पर्यटकांना सरकार त्यांच्यासोबत असल्याचे मी सांगितले. मी येथे फक्त उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एका महाराष्ट्रीयन, मराठी व्यक्ती म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित घरी देण्यासाठी आलो आहे.

श्रीकांत शिंदेंचे कौतुक

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपले पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, या कठीण काळात डॉ. श्रीकांत शिंदे यांटी टीम उत्कृष्ट काम करत आहे. अडकलेल्या पर्यटकांना ते मदतीचा हात देत आहेत. प्रत्येक व्यक्तीचे ते काळजी करत आहेत. पर्यटकांच्या मागे आपले सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. आम्ही सर्वांना घरी परत आणू, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आज सर्वपक्षीय बैठक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत पहलगाम हल्ल्याची माहिती तसेच पुढील रणनीती विषयी माहिती देण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून देखील पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे.

 Eknath Shinde meets stranded tourists in Kashmir, assuring safety and coordination following the Pahalgam terror attack.
Robert Vadra Statement : दहशतवादी हल्ल्याने देश संतापलेला असताना, रॉबर्ट वाड्रांचं वादग्रस्त विधान; म्हणाले ''देशात मुस्लिम...''

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com