Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंनी केली आमदारांची नाराजी दूर; म्हणाले, 'दुसऱ्या टप्प्यात दोघेही....'

Political News : शिवसेना शिंदे गटातील काही आमदारही नाराज असल्याचे पुढे आले होते. या नाराज असलेल्या आमदारांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढत नाराजी दूर केली.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असून शुक्रवारी पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच राज्य मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने नाराज आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील काही आमदारही नाराज असल्याचे पुढे आले होते. या नाराज असलेल्या आमदारांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढत नाराजी दूर केली. (Eknath Shinde News)

शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील 12 जणांची मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे काही आमदार नाराज झाले असल्याचे पुढे आले होते. विशेषतः गेल्या अडीच वर्षाच्या काळात मंत्री असलेल्या तानाजी सावंत, दीपक केसरकर व अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले तर माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार भोंडेकर यांची वर्णी न लागल्याने सर्वजण नाराज होते.

Eknath Shinde
Santosh Deshmukh Case : "वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतो..."; संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीसांनी थेट निशाणा साधला

शुक्रवारी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी नाराज असलेले आमदार विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार भोंडेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिपदासाठी श्रद्धा व सबुरी ठेवण्याची सूचना केली. पहिल्या टप्प्यात म्हणजे अडीच वर्षांसाठी काही जणांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काही जणांना मंत्री करण्यात येणार आहे. त्यामुळे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांना संधी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Solapur Politic's :मोहिते पाटलांच्या मदतीने आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही; राम सातपुतेंची घोषणा

शिवसेनेतील या आमदारांची नाराजी दूर केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. राज्यातील महायुती सरकारच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे येत्या काळात गेल्या अडीच वर्षात सुरु असलेल्या योजना सुरूच राहणार आहेत. यामधील कोणतीच योजना बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकारच्या काळात आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी दिली खूशखबर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com