Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी दिली खूशखबर

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana December installment : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत होता. डिसेंबरच्या हप्त्या कधी मिळणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली आहे.
Devendra Fadnavis ladki bahin yojana.
Devendra Fadnavis ladki bahin yojana.Sarkarnama
Published on
Updated on

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत होता. त्यातच लाडकी बहीण योजनेचे निकष बदल्यात येतील अशा चर्चाही होत होत्या. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात बँक खात्यात जमा झाला.

या योजनेचे आधीचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आतापर्यंत एकही हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा या योजनेचा हप्ता कधी मिळणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी काल पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. त्यातच त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर केल्या आहेत. 'राज्यातील एकही योजना बंद पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.'

Devendra Fadnavis ladki bahin yojana.
Parbhani violence : परभणीतील हिंसाचार अन् हिंदू संघटनांचा मोर्चा, सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू कशामुळे? सभागृहात CM फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

ज्या लाडक्या बहि‍णींनी महायुतीवर प्रेम दाखवलं त्यांना या योजनेचा फायदा होणारचं. त्यामुळे हे अधिवेशन संपताच डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्ही जमा करणार आहोत, अशी घोषणा यावेळी केली. नवीन कोणतेही बदल आणि निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशाला लाडक्या बहि‍णींचे मोठे श्रेय असल्याचे मानलं जात आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली.

Devendra Fadnavis ladki bahin yojana.
Om Birla : धक्काबुक्की प्रकरणानंतर ओम बिर्ला यांचा मोठा निर्णय!

तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत पुरवणी मागणी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com