

Eknath Shinde News : महायुतीमधून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला चार जागा आला आहेत. या चारही जागेवर एकनाथ शिंदेंनी उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे ठाण्याच्या जागेसाठी भाजपने ताकद लावली होती. मात्र, ही जागा स्वतःकडे ठेवण्यात शिंदेंना यश आले आहे. त्यामुळे शिंदेंनी गड राखल्याच चर्चा आहे. ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणीमधील उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत.
ठाण्यामधून बविआला पाठींबा देत क्षीतीज ठाकूर यांना शिंदे उमेदवारी देतील अशी चर्चा होती. मात्र, भाजपसोबत झालेल्या चर्चेनंतर ठाणे आपल्याकडे ठेवत त्यांनी तेथून यापूर्वी आमदार असलेल्या रवींद्र फाटक यांच्यावर पुन्हा विश्वात दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. ठाण्यातील ठेंभी नाका येथे आनंदआश्रमात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते फाटक यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला. आज ते दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
नाशिक मतदारंसघासाठी देखील शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच होती. मात्र, शिवसेनेला या मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश आले असून येथून एकनाथ शिंदेंनी विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल कदम यांच्यासोबत त्यांची लढत होईल.
शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सईद खान ओळखले जात आहेत. ते परभणीमधील मोठे कंत्राटदार म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय म्हणून चर्चा होती. एका प्रकरणात ईडीकडून देखील त्यांची चौकशी करण्यात आली होती. सईद खान यांना उमेदवारी देत अल्पसंख्यांकांना देखील शिवसेना प्रतिनिधीत्व देते, असा संदेश एकनाथ शिंदेंनी दिल्याची चर्चा आहे.
यवतमाळमधून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच संजय राठोड यांनी लोकसभेसाठी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना त्यामध्ये यश आले नाही. बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आपल्या घरात उमेदवारी ठेवण्यात संजय राठोड यांना यश आल्याचे बोलले जात आहे.
ठाणे - रवींद्र फाटक
नाशिक - नरेंद्र दराडे
परभणी - सईद खान
यवतमाळ - शीतल संजय राठोड
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.