Eknath Shinde vs BJP : चर्चेत गुंतवलं अन् एकनाथ शिंदेंना एकटं पाडलं; तब्बल 22 महापालिकांमध्ये भाजपकडून 'करेक्ट कार्यक्रम'

Municipal Elections BJP Strategy : एक दोन नव्हे तर तब्बल 22 महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली आहे.
Eknath Shinde VS BJP
Eknath Shinde VS BJP sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : भाजपकडून पदाधिकारी, कार्यकर्ते फोडले जात असताना एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मध्यस्थीने महापालिका निवडणूक भाजप शिंदेंसोबतच लढणार असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील युतीची बोलणी सुरू झाली. आता उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सर्व महापालिकांमधील चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबई आणि ठाणे वगळता भाजपने शिंदेंना चर्चेत अडकवून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे.

तब्बल 22 महापालिकांमध्ये युती तुटली आहे. जालना, परभणी, अमरावती, लातूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, अकोले, नांदेड, सोलापूर, धुळे, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक आदी ठिकाणी महायुती तुटली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये अवघ्या चार ते पाच जागाच देण्याची तयारी दाखवली. शिवसेनेकडून 15 जागांची यादी भाजपला देण्यात आली. मात्र, पाच जागांच्यावर एकही जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवली नाही. युती होईलच अशी आस लावून बसलेल्या शिवसेना इच्छुक उमेदवारांचा त्यामुळे ऐनवेळी घात झाला. त्यामुळे तातडीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करता येईल का याची चाचपणी करण्यात आली. मात्र, तोपर्यंत वेळ हातून निघून गेल्याचे दिसून आले.

Eknath Shinde VS BJP
BJP internal conflict : फिल्डिंग लावून पत्ता कट, भाजप इच्छुक उमेदवार संतापला; किशोर जोरगेवारांचं दहा वर्षांपूर्वीचं 'फॉर्महाऊस कांड' काढून बसला

पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भाजप आणि शिवसेनेची युती निश्चित मानली जात होती. भाजप मोठा भाऊ असेल आणि सन्मानजनक जागा घेत शिंदेंची शिवसेना भाजपसोबत जाईल, असे मानले जात होते. मात्र, भाजपने शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवले. सोमवारी रात्री उशीरा युती होणारच नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.

या महापालिकांमध्ये युती

भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहा महापालिकांमध्ये युती झाली आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, चंद्रपूर, नागपूर, भिवंडी यांचा समावेश आहे. काही झाले तरी शेवटी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना होता. मात्र, भाजपने चर्चेचे गुऱ्हाळ लांबवत सन्मानजनक जागा न देता अनेक ठिकाणी शिंदेंना स्वबळावर लढण्यास भाग पाडल्याचीही चर्चा आहे.

Eknath Shinde VS BJP
Nashik NMC Politics: नाशिक महापालिकेत महायुती का फिस्कटली?; गिरीश महाजन यांनी सांगितले ‘ते’ गंभीर कारण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com