New Dehli News : केंद्रातील मोदी सरकारकडून डीलिमिटेशन बिल संसदेत मांडले जाणार आहे. त्याची तयारी गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. इंडिया आघाडीने एकमुखाने या विधेयकाला विरोध करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन ही दोन्ही विधेयके महत्त्वाची असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांची कोंडी करताना या दोन्ही विधेयकांबाबत शिवसेनेची भूमिका जाहीर केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर शिवसेना ठामपणे केंद्र सरकारच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा मतदारसंघ असो किंवा विधानसभा मतदारसंघ, या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळते. महिला आरक्षणामुळे महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यांना न्याय देता येईल. महिला आरक्षणामुळे महिलांना राजकारणात न्याय मिळेल, तर मतदारसंघ पुनर्रचनेमुळे विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येईल. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन या दोन्ही महत्त्वाच्या विधेयकांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांनी जाहीर केली आहे.
शिवसेनेची (Shivsena) या दोन्ही विधेयकांबाबत भूमिका आम्ही जाहीर केली आहे. आमच्या पक्षाचा आणि सर्व खासदारांचा या विधेयकांना पूर्ण पाठिंबा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर शिवसेना ठामपणे सरकारच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. महिलांना न्याय देण्याचे काम आम्ही यापूर्वीच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिलं असून त्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.