Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? कॅबिनेटमधील 'या' कृतीमुळे चर्चाना उधाण

Eknath Shinde upset News : भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये या-ना त्या कारणावरून नाराजी असल्याचे पुढे येत आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एक हाती विजय मिळवला. त्यानंतर राज्यात 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, सरकार स्थापन करण्यापासून ते आतापर्यंत महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही.

भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये या-ना त्या कारणावरून नाराजी असल्याचे पुढे येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीस ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात शिंदे नाराज असल्याच्या चर्चां जोरात रंगल्या आहेत.

Eknath Shinde
Supriya Sule : 'एकामुळे अजितदादांच्या पक्षाची 50 दिवस हेडलाईन'; खासदार सुळेंनी मंत्री मुंडेंना डिवचलं

महायुतीची सत्ता राज्यात आल्यापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडत या वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर खातेवाटपावरून नाराजी दर्शवली होती. शपथविधीच्या काही तास अगोदरपर्यंत भाजप-सेनेतील चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुतीत पालकमंत्रीपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त केली. रायगडमध्ये तर मोठा वाद उफाळून आलेला बघायला मिळाला. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमधूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

Eknath Shinde
Dhananjay Munde: देवाभाऊंची पहिली लिटमस टेस्ट; धनूभाऊ राजीनामा देणार का? दिल्ली हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या नाराजीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी मंत्रालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितत राहिल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रत्यक्ष अनुपस्थितीवर शिवसेनेचे (Shivsena) मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde
Dhananjay Munde: '...तर मी राजीनामा देणार', मंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकले नाहीत. पण ते व्हिसीद्वारे उपस्थित राहिले. ते नाराज नाहीत असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते माझ्यासोबत बोलले होते. त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा वेळ लागला. त्यामुळे ते स्वत:हून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की, तुम्ही बैठक सुरु करा, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Pankaja Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या,'मी फक्त तुमचं...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com