
Eknath Shinde News : दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीमध्ये भाजपकडेच मुख्यमंत्रिपद असणार हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीच्या आधीचा फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांची बाॅडी लँग्वेजमध्ये ते नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. मंत्रिपदांबाबत महाराष्ट्रात पुढील चर्चा होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे आल्यानंतर थेट आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात गेले आहेत.
महायुती सरकारचा शपथविधी हा पाच डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी गेल्याने शिंदें नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, शिंदे दरेगावत जाण्या मागचे कारण भरत गोगावले यांनी सांगितले आहे.
निवडणुकीच्या धावपळीत साहेबांनी आराम केला नाही.त्यामुळे ते साहेब आराम करायला गावाला गेले आहेत, असे भरत गोगावले म्हणाले.
भाजपकडे मुख्यमंत्रिपद जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहमंत्रिपदासाठी आग्रह केला जातो आहे. तर, भाजप देखील गृहमंत्री आपल्याकडे ठेवण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद घेण्यास शिंदे इच्छुक नसल्याचीही चर्चा आहे.
भरत गोगावले यांनी मागील मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळाली नाही. मात्र या मंत्रिमंडळात आपले मंत्रिपद फिक्स असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणूक महायुतीमधून लढू असे देखील गोगावले यांनी सांगितले मात्र वेगळे काही झाले तरी आम्ही पूर्ण तयारी ठेवली आहे, असे देखील सांगितले.
एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही, यावर चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारू नये, असा एक विचारप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा आहे. तसेच उदय सामंत, दादा भुसे यांची नावे देखील उपमुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.