Mahayuti News : भाजपची मतांची टक्केवारी घटली; पण जागा वाढल्या? महायुतीच्या यशाचे 'हे' आहे नेमकं कारण

Political News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपची टक्केवारी किंचीत कमी झाली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत 23 लाख अधिक मते मिळवली आहेत. त्याचा फायदा महायुतीला झाला आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. महायुतीमुळे महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. महायुतीने या निवडणुकीत 233 जागांवर विजय मिळवला असून भाजपला 26.77 टक्के मते मिळवली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपची टक्केवारी किंचीत कमी झाली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत 23 लाख अधिक मते मिळवली आहेत. त्याचा फायदा महायुतीला झाला आहे. (Mahayuti News)

राज्यात येत्या काळात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र महायुतीच्या विजयाची व महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे शोधली जात आहेत. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत 23 लाख अधिक मते मिळवण्यात भाजप (BJP) यशस्वी झाला आहे. त्याचा फायदा महायुतीला झाला आहे. त्यासोबतच मतांच्या टक्केवारीचा विचार करायचा झाल्यास, सर्वाधिक चांगली कामगिरी ठरली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची ठरली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला काँग्रेसच्या मताच्या टक्केवारीत मोठी घट झाली. त्यामुळे मोठा फटका सहन करावा लागला आहे.

Mahayuti Vs MVA
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा पक्ष मराठवाड्याच्या राजधानीतून गायब, याला जबाबदार कोण ?

विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळणाऱ्या मतांचा टक्का वाढवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सर्वाधिक यशस्वी ठरला. अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फक्त 3.60 टक्के मते मिळाली होती, जी या विधानसभा निवडणूकीत वाढून10.56 टक्के इतकी झाली आहेत. काँग्रेसचा घसरलेला मतांचा टक्का आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची वाढलेली मते हेच महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाचे प्रमुख कारण असू शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्व जाती-धर्मातील लोकांचा पाठिंबा मिळाला होता. पण हा पाठिंबा काँग्रेस पक्षाला पुढचे काही महिने टिकवून ठेवता आला नाही.

Mahayuti Vs MVA
Latur Political News : लोकसभा निवडणुकीत गेलेली पत `जन सन्मान यात्रा` निलंगेकरांना मिळवून देणार का ?

एप्रिल महिन्यात झालेली लोकसभा निवडणूक आणि नोव्हेंबरमध्ये झालेली विधासभा निवडणूक या दोन्ही निवडणुकींमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मात्र 6 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घटली आहेत. भारतीय जनता पक्षांच्या मतांचा टक्का देखील किंचित कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मात्र त्यांच्या मतांची टक्केवारी जवळपास होती तेवढी टिकवली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10.27 टक्के मते मिळवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने 13 जागा जिंकल्या ज्यामध्ये पक्षाने 11.67 टक्के मते मिळवली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 10.88 टक्के मते मिळाली होती, ज्यामध्ये काँग्रेस पक्ष फक्त 16 जागा जिंकता आल्या तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 13 जागा जिंकल्या होत्या आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाने एकूण मतांच्या 16.92 टक्के मते मिळवली होती.

Mahayuti Vs MVA
Mahayuti News : लाडक्या बहिणींना सत्तेतही मोठा वाटा मिळणार? महायुतीकडून महिला आमदारांना 'गिफ्ट'!

महायुतीमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत 127 जागांवर विजय मिळवला आहे, ज्यामध्ये पक्षाला 25.32 टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाने 9 जागा या 26.18 टक्के मतांसह जिंकल्या होत्या. यापूर्वीच्या निवडणुकीत 2014 आणि 2019 मध्येही भाजपने चांगली कामगिरी केली होती, परंतु यंदा अनुभवास येत असलेली निवडणुकीतील कामगिरी चांगली ठरली आहे. भाजपच्या मतांची संख्या वाढून 1 कोटी 72 लाख झाली आहे, ज्यामुळे 132 जागा जिंकण्यात यशस्वी होऊन भाजपने मोठे रेकॉर्ड केले आहे. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये त्यांनी 105 जागांवर विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत 23 लाख अधिक मते मिळवण्यात भाजप यशस्वी झाला आहे. त्याचा फायदा महायुतीला झाला आहे.

Mahayuti Vs MVA
Mahayuti Updates : बहुमत मिळूनही महायुतीत नेमकं चाललंय तरी काय ? आधी सीएम पद अन् आता मलाईदार खात्यांसाठी खेचाखेची

लोकसभा निवडणुकीत 7 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या होत्या, यावेळी त्यांना 12.95 टक्के मते मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने ऐतिहासिक 54 जागा जिंकल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना 12.50 टक्के मते मिळली. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला लोकसभेच्या 9 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना 16.72 टक्के इतकी मते मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा आणि 10.74 टक्के मते मिळाली आहेत. या टक्केवारीच्या फरकामुळेच महायुतीला विजय मिळवता आला. महाविकास आघाडीच्या मताची एकूण टक्केवारी 33.29 टक्के इतकी होते तर महायुतीची टक्केवारी 48.83 टक्के इतकी आहे. त्याचाच फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला आहे.

Mahayuti Vs MVA
Mahayuti Updates : बहुमत मिळूनही महायुतीत नेमकं चाललंय तरी काय ? आधी सीएम पद अन् आता मलाईदार खात्यांसाठी खेचाखेची

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com