Sunetra Pawar News : केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवार यांना पत्र : पक्षाच्या घटनेतील बदलाची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

Maharashtra NCP latest News : 26 फेब्रुवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडले होते. यावेळी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. ते सर्व प्रस्ताव व कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पत्राद्वारे केल्या आहेत.
Deputy CM Sunetra Pawar i
Deputy CM Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

New Dehli news : राष्ट्रवादी काँग्रेससमोरील (अजित पवार पक्ष) अडचणीत वाढ झाली आहे. पक्षाच्या घटनेत बदल केल्याची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून केल्या आहेत. 26 फेब्रुवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडले होते. यावेळी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. ते सर्व प्रस्ताव व कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने 27 जुलैला पाठवलेल्या पत्राद्वारे केल्या आहेत.

26 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या संविधानमधील 6, 7, 12, 32 आणि 36 कलमांमधील बदलांना मान्यता देणारे पत्र निवडणूक आयोगाला प्राप्त झाले नाही, असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे, आता आयोगाने या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्रे आणि प्रस्तावांची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाने 27 जुलैला पाठवलेले हे पत्र पक्षाच्या तांत्रिक प्रक्रियेमधील एक भाग आहे. हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावाने आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीची कार्यकारिणी बोलावण्यत आली होती. या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे जे कलम आहेत, संविधानातील 6,7, 12, 32 आणि 36 यामध्ये त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीकडून बदल करण्यात आला होता.

Deputy CM Sunetra Pawar i
BJP News: भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी निर्दोष मुक्तता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. या कार्यकारिणीमध्ये पक्षाचे जे कलम आहेत, संविधानातील 6,7, 12, 32 आणि 36 यामध्ये त्यावेळी बदल करण्यात आला होता. परंतु पक्षाच्या घटनेतील बदलांबाबतची कागदपत्रे आणि प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पोहोचलेले नाहीत, त्यामुळे आता निवडणूक आयोगाने या कागदपत्रांबाबत आणि प्रस्तावाबाबत पक्षाकडे विचारणा केली आहे. पक्षाच्या घटनेतील बदलाबाबतचे कागदपत्रे सादर करा, असे निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटले आहे.

Deputy CM Sunetra Pawar i
BMC Budget : सर्वात श्रीमंत महापालिका, बजेटचा आकडे ऐकूण बसले धक्का; 'ही' राज्य आसपासही नाहीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com