MLC Election Live : मोठी बातमी : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर; आयोगाकडून घोषणा

Maharashtra Legislative Council Election Shedule Election Commission News : विधान परिषदेतील पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
Maharashtra Election
Maharashtra ElectionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मागील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यात पुन्हा निवडणुकीचा मौसम सुरू झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ता. 27 मार्चला या जागांसाठी मतदान होणार असल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

विधान परिषदेतील पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. या आमदारांमध्ये आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे.

Maharashtra Election
Shivsena News : उद्धव ठाकरेंचा सातबारा कोरा होणार; आशिष जयस्वालांचा राऊतांना टोला

आयोगाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 10 मार्चला नोटीफिकेशन प्रसिध्द केले जाणार आहे. त्यानंतर 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दुसऱ्या दिवशी अर्जांची छानणी होईल. त्यानंतर 20 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर मतदान व मतमोजणी 27 मार्चला होणार आहे. सकाळी 9 ते 4 ही मतदानाची वेळ आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

दरम्यान, आमश्या पाडवी यांची मुदत 7 जुलै 2028 ला संपत होती. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेत फुट पडण्याआधी ते विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. प्रविण दटके यांचा कार्यकाळ 15 मे 2026 पर्यंत होता. तेही विधानसभेत निवडून गेल्याने जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. त्यांनीही विधानसभेत बाजी मारल्याने ही जागा रिक्त झाली.

Maharashtra Election
Takkal Virus : 'टक्कल व्हायरस'वरुन मंत्री प्रतापराव जाधवांची ओपन चॅलेंज, डाॅ.बावस्कर म्हणाले,'डिग्री फाडेन...'

रमेश कराड हे भाजपच्या तिकीटावर लातूर ग्रामीणमधून विजयी झाले आहेत. त्याआधी ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ पुढीलवर्षी मे महिन्यात संपणार होता. भाजपचे दुसरे आमदार गोपीचंद पडळकर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळही पुढीलवर्षी संपत होता. तेही विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याने जागा रिक्त झाली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com