Shivsena News : उद्धव ठाकरेंचा सातबारा कोरा होणार; आशिष जयस्वालांचा राऊतांना टोला

Ashish Jayswal on Uddhav Thackeray News : शिंदे सेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पक्ष हा सातबारा प्रमाणे नातेवाईकांना हस्तांतरित होत नसतो, असे सांगून राऊतांवर बोचरी टीका केली.
Sanjay Raut, Ashish jayswal
Sanjay Raut, Ashish jayswal Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शिवसेना कोणाची यावरून सातत्याने उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाद सुरू असतात. दावे-प्रतिदावे केले जातात. संजय राऊत संधी मिळेल त्यावेळी शिंदे यांच्यावर आरोप आणि टीका करीत असतात. यावर आपले मत व्यक्त करताना शिंदे सेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पक्ष हा सातबारा प्रमाणे नातेवाईकांना हस्तांतरित होत नसतो, असे सांगून राऊतांवर बोचरी टीका केली.

संजय राऊत (Sanjay Raut) रोजच काही तरी बोलत असतात. बडबड करीत असतात. त्यांना आता कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना निवडणूक लढायची नाही आणि राज्यसभेतील स्थान कायम ठेवायचे आहे. याकरिता ते सकाळी उठून काही तर टीकाटीपणी करतात. स्वतःकडे उद्वव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा सातत्याने खटाटोप सुरू असतो. मात्र त्याने काही फरक पडणार नाही, असे आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut, Ashish jayswal
Shivsena Vs Shivsena : आनंद आश्रमाबाहेर दोन्ही शिवसेना गट आमने सामने

शिवसेना कोणाची हे आता सिद्ध झाले आहे. कोर्टाने आणि जनतेच्या न्यायालयातही शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामामुळे आणि कर्तृत्वाने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आपणच शिवसेनेचे वारसदार आहोत हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग हळूहळू एकनाथ शिंदे यांच्याकडे येत आहे आणि येतच राहणार आहे.आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोणाचा सातबारा घेण्याची आवश्यकता नसल्याचे आशिष जयस्वाल म्हणाले.

Sanjay Raut, Ashish jayswal
Devendra fadnavis : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, अण्णा हजारेंचा आदर पण...

राज्यातील जनतेने प्रचंड बहुमत महायुती सरकाराला दिले आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून लोकांचे मन जिंकण्याचं काम आम्ही राज्याच्या अर्थसंकल्पातून करणार आहोत. वन प्राण्यांचा हल्ल्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. त्यासाठी नवीन धोरण आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut, Ashish jayswal
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पुन्हा एकदा करुणा शर्मांचा मोठा दावा; नेमके कारणच सांगितले

वन क्षेत्रात राहणाऱ्या कार्यकर्ता म्हणून या प्रश्नाचे गांभीर्य मला माहीत आहे. त्यामुळे नवीन धोरणात याचा सर्वंकष विचार केला जाणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी निरपराध लोकांचा बळी जात आहे, याची जाणीव नव्या धोरणात ठेवली जाणार आहे, असेही यावेळी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

Sanjay Raut, Ashish jayswal
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची चिंता मिटली; सरकारकडून मोठी घोषणा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता 'या' दिवशी जमा होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com