Takkal Virus : 'टक्कल व्हायरस'वरुन मंत्री प्रतापराव जाधवांची ओपन चॅलेंज, डाॅ.बावस्कर म्हणाले,'डिग्री फाडेन...'

Takkal Virus Himmatrao Bawaskar challenge Prataprao Jadhav : टक्कल व्हायरस संदर्भात केंद्राचे पथक दाखल झाले होते. त्यांनी तपासणीसाठी आयसीएमआरकडे काही नमुने पाठवले आहेत. त्याचा अहवाल अद्यापही आला नाही.
 Himmatrao Bawaskar challenge Prataprao Jadhav
Himmatrao Bawaskar challenge Prataprao Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Himmatrao Bawaskar News : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 18 गावांमध्ये अचनाक केस गळती होऊन टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण झाले होते. 'टक्कल व्हायरल'मुळे काही लोक गाव सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे टक्कल पडत असल्याचा दावा केला जात होता.

ज्येष्ठ संशोधक पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन करत रेशनमधील गहूतील विषारी तत्वामुळे टक्कल पडत असल्याचा सांगितले. मात्र, त्यांच्या दाव्यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि बावस्कर यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे.

 Himmatrao Bawaskar challenge Prataprao Jadhav
Aam Aadmi Party: दिल्लीतील पराभवानंतर AAP ला घरघर! पक्ष कार्यालयाला ठोकले टाळे; काय आहे कारण

टक्कल व्हायरस संदर्भात केंद्राचे पथक दाखल झाले होते. त्यांनी तपासणीसाठी आयसीएमआरकडे काही नमुने पाठवले आहेत. त्याचा अहवाल अद्यापही आला नाही. त्याविषयी मंत्री प्रतापराव जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, आयसीएमआर ही काही खासगी कंपनी नाही बावस्करासारखी की संशोधन केले आणि लगेच दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले. आयसीएमआर हे विश्वासार्ह आहे.

जाधव यांच्या वक्तव्यानंतर डाॅ.बावस्कर यांनी ओपन चॅलेंज देत जर आपले संशोधन चुकीचे ठरले तर आपली डिग्री फाडू. माझ्या संशोधनाच्या मागे का लागता सरकारने आयसीएमआरच्या मागे लागावे. दोन महिन्यासाठी आयसीएमआरला नमुने घेऊन गेले. त्याचे काय झाले? मी स्वतःच्या खर्चाने संशोधन केले. भारतात स्वतःचे पैसे खर्च करून संशोधन करणारे दाखवा मी माझी डिग्री फाडून टाकीन.

 Himmatrao Bawaskar challenge Prataprao Jadhav
MLC Election Live : मोठी बातमी : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर; आयोगाकडून घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com