Election Survey News : विधानसभा 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली.गेल्या 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन सरकारं सत्तेत आली. अडीच अडीच वर्षांचा कालावधी मिळालेल्या या दोन्ही सरकार अर्थात आधी ठाकरे आणि नंतरच्या शिंदे सरकारमधील नेतेमंडळींकडून विकासकामं, योजना, शेतकरी आणि उद्योगधंदे, शिक्षण अशा विविध मुद्द्यांवरुन दावे - प्रतिदावे करत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
पण विधानसभा निवडणुकीच्या अगदी काही महिन्यांवर आलेली असताना दिल्लीतील 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज' (सीएसडीएस) आणि पुण्यातील 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' (सॉग) यांच्या 'लोकनीती' कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास 2024 मध्ये दिसून आलेल्या निष्कर्षातून मोठी माहिती समोर आली आहे.
सीएसडीएस आणि सॉग यांच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे करण्यात आलेल्या महाराष्ट्र निवडणूकपूर्व सर्वेक्षण 21 सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर 2024 या कालावधीत करण्यात आले. महाराष्ट्रातील 39 विधानसभा मतदारसंघ आणि 139 मतदान केंद्रावर एकूण 2 हजार 607 सात जणांची मुलाखत घेण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.
या सर्वेक्षणात महाविकास आघाडी आणि महायुती (Mahayuti) सरकारमधील महाराष्ट्रातील एकूण विकास,सामाजिक सौहार्द, स्थिर सरकार, शेतकर्यांची स्थिती,वीजपुरवठा रस्त्यांची स्थिती, या मु्द्द्यांवर जनतेचा नेमका कौल समोर आला आहे. या सर्व्हेक्षणात रस्ते,वीज, पाणी या मुद्द्यांवर शिंदे सरकारने बाजी मारली आहे तर महाविकास आघाडी एकूण विकास,सामाजिक सौहार्द, स्थिर सरकार या मुद्द्यांवर वरचढ ठरली आहे.
राज्यात आघाड्यांची समीकरणे बदलत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली. सुमारे अडीच वर्ष सत्तेत टिकलेल्या या सरकारला कोरोनाची लाट आणि शिवसेनेतील फुटीचा सामना करावा लागला.
जून 2022 मध्ये भाजपबरोबर आघाडी करत एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार सत्तेत आले. मागील पाच वर्षांत दोन सरकारे राज्यात सत्तेवर होती. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची तुलना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aahghadi) काळात राज्याचा एकूण विकास 45 टक्के तर महायुती सरकारच्या काळात 41 टक्के राहिल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे.तर उर्वरित 14 टक्के लोकांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. तसेच सामाजिक सौहार्दतेच्या मुद्द्यांवर जनतेने पुन्हा एकदा मविआ सरकारलाच पसंती दिली आहे.
त्यात 41 टक्के लोकांनी आघाडी सरकारच्या बाजूने तर 37 टक्के लोकांनी महायुती सरकारला कौल दिला आहे.तर उर्वरित 22 टक्के लोकांनी युती आघाडी सरकारच्या काळातील या मुद्द्यावर मत नोंदवलेले नाही.
कोणतं सरकार स्थिर वाटलं? या मुद्द्यांवर सर्व्हेत लोकांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींवरही जवळपास सारखाच विश्वास टाकला आहे.त्यात महाविकास आघाडीला 40 आणि महायुतीला 39 टक्के मतदान केले आहे.तर 11 टक्के लोकं कोणीच नाही अशा भूमिकेत असल्याचे दिसून आलं आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमधील राज्यातील शेतकर्यांची स्थितीही या सर्व्हेतून जाणून घेण्यात आली. त्यात 31 टक्के लोकांनी मविआ,तर 23 टक्के लोकांनी महायुती सरकारवर विश्वास दाखवला. तसेच 30 टक्के लोकांनी या दोन्ही सरकारच्या काळात काहीच फरक पडला नाही असं मत नोंदवलं असून तसेच 16 टक्के लोकांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. वीजपुरवठ्याच्या बाबतीत महायुती सरकारला लोकांची चांगली पसंती मिळाली आहे.यात 37 टक्के लोकांची महायुती, 27 टक्के लोकांनी महाविकास आघाडी तर 32 टक्के लोकं म्हणतात काहीच फरक नाही.तर 4 टक्के लोकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
युती आणि आघाडी सरकारच्या काळातील रस्त्यांच्या स्थितीवरही लोकांनी या सर्व्हेत महायुती सरकारलाच कौल दिला आहे. त्यात 43 टक्के महायुती,24 महाविकास आघाडी आणि 28 टक्के लोकांना दोन्ही सरकारमध्ये काहीच फरक नाही असं म्हटलं आहे.तर 5 टक्के लोकांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.