Balwant Wankhade : ...तर बळवंत वानखडे खासदारकीचा राजीनामा देणार; नवनीत राणांचं चॅलेंज स्वीकारलं

Navneet Rana challenge to Balwant Wankhade : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.
Balwant Wankhade, Navneet Rana
Balwant Wankhade, Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Amravati News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच देशभरात ईव्हीएमविरोधात विरोधकांकडून आवाज उठवला जाऊ लागला आहे. त्यावरून सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांना राजीनामे देण्याचे आव्हान दिले जात आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनीही काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज वानखडे यांनी स्वीकारले आहे.

ईव्हीएमवर शंका असेल तर वानखडे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान राणांनी दिले होते. अमरावतीचे खासदार वानखडे यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. तसेच त्यांनी राणांनाही प्रतिआव्हान दिले आहे. भाजपच्या विश्व नेत्या, राष्ट्रीय नेत्या नवनीत राणा असा उल्लेख करत वानखडे यांनी त्यांना टोलाही लगावला आहे.

Balwant Wankhade, Navneet Rana
Tamil Nadu Scientist Cheated: RSS चा 'खासदार' अटकेत; राज्यपाल पदाचं आमिष दाखवून शास्त्रज्ञाची 5 कोटींची फसवणूक

वानखडे यांनी म्हटले आहे की, नवनीत राणा यांनी दिलेल्या आव्हानाप्रमाणे मी राजीनामा द्यायला तयार आहे. पण त्याआधी त्यांनी निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र द्यावं. येणारी लोकसभेची पोटनिवडणूक बॅलेटपेपरवर होईल, असा उल्लेख त्या पत्रात असावा. त्यानंतर मी कधीही राजीनमा द्यायला तयार आहे, असे वानखडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीच्या निकालात सर्वकाही ठीक होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधात आल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर वानखडे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील.

Balwant Wankhade, Navneet Rana
ShivSena Politics : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची फिल्डिंग; संघटना बांधणीचा हा आहे 'प्लॅन'

मारकडवाडी बनले ईव्हीएमविरोधातील केंद्र

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गाव देशातील ईव्हीएमविरोधाचे केंद्र बनले आहे. विधानसभेच्या निकालानंतर या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाच्या विरोधामुळे ही प्रक्रिया झाली नाही. मात्र, त्यानंतर या गावाने देशपातळीवर लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावाला भेट दिली. काँग्रेस नेते राहुल गांधीही या गावात येणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com