
Baramati News : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत शनिवारी (ता.1 फेब्रु.) सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवला.त्यांनी सादर केलेल्या केंद्री अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स, आरोग्य, नोकरदार, व्यावसायिक, उद्योग, महिला, युवा, शिक्षण, विमा कंपन्या, शेतकरी अशा विविध घटकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या.
या अर्थसंकल्पावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तर विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.पण यात आता महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या अर्थसंकल्पावर मोठी कबुली दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात(Union Budget 2025) महाराष्ट्राला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.पण आता अर्थमंत्री अजित पवारांनीच आपल्याला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ऐकण्याची इच्छा होती मात्र,कामाच्या गडबडीमुळे तो ऐकता आला असल्याचं भरस्टेजवरुन सांगून टाकलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे बारामतीतील एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. खरंतर मला तो ऐकायचा होता. पण कामाच्या व्यापात राहिलं. पण मी ते रेकॉर्डिंग करुन ठेवायला सांगितलं आहे.
आज सादर होत असलेल्या अर्थसंकल्पातून आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमच्या सरकारच्या मंत्रिमंडळाला,संपूर्ण महाराष्ट्राला निश्चित अपेक्षा आहे.आणि त्या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वासही अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
अजितदादा म्हणाले, सकाळी लवकर कामाला सुरुवात करुनही कामाच्या व्यापामुळे या यूनियन बँकेच्या कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला.तसेच त्यांनी गेले तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही मोठं भाष्य केलं.
गेले तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना आणि शहरी भागातील नगरपालिका,नगरपंचायत,नगरपरिषदेत नगरसेविका किंवा नगरसेवक होण्याची संधी किंवा जिल्हा परिषदेतील संधी काही ना काही कारणानं पुढं गेली आहे.त्यामध्ये ओबीसींचं आरक्षणाबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टानं द्यायचा असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.