Cash bomb shivsena Minister video : महेंद्र दळवीनंतर शिंदे सेनेच्या मंत्र्यावर कॅशबॉम्ब! चित्रलेखा पाटील यांनी थेट व्हिडिओच आणला समोर... आता काय होणार?

Shinde Sena controversy News : शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा समोर नोटांचे बंडल असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर आता रायगडमधील शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी आणखी एक व्हिडिओ समोर आणला आहे.
chitrlekha patil
chitrlekha patil Sarkarnama
Published on
Updated on

Raygad News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा समोर नोटांचे बंडल असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर आता रायगडमधील शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी आणखी एक व्हिडिओ समोर आणला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगवले मोठ्या रकमेसह दिसत आहेत. मंत्री गोगावले यांच्या समोर मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ऐन अधिवेशन काळात हा व्हिडिओ समोर आल्याने येत्या काळात भरत गोगावले (Bharat Gogavale) यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. दोन दिवसापूर्वीच ठाकरे सेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा समोर नोटांचे बंडल असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओनंतर सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता रायगडमधील शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी पुन्हा एक व्हिडिओ समोर आणला आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

chitrlekha patil
Sangli BJP News: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपचं टेन्शन वाढलं; 78 जागांसाठी 570 इच्छुकांकडून उमेदवारीसाठी अर्ज

चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी शिवसेनेचे (Shivsena) मंत्री भरत गोगवले यांचा मोठ्या रकमेसह दिसत असलेला व्हिडिओ व्हायरल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिंदे सेनेच्या आमदारापाठोपाठ आता मंत्री अडचणीत आला आहे.

chitrlekha patil
Shivsena UBT Dispute : पुरुषोत्तम बरडे शिवसेनेच्या बैठकीकडे फिरलेच नाहीत; पण खैरे म्हणतात, ‘दासरींसोबतचा वाद मिटला...’

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री गोगावले यांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे. यावेळी पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत, असा आरोपही केला आहे.

chitrlekha patil
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

दरम्यान, या आरोपानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री भरत गोगावले यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गोगावले यांनी केली असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकाकडून केवळ आरोप करून नाहक बदनामी केली जात असल्याचे गोगावले यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

chitrlekha patil
Shivsena UBT Dispute : पुरुषोत्तम बरडे शिवसेनेच्या बैठकीकडे फिरलेच नाहीत; पण खैरे म्हणतात, ‘दासरींसोबतचा वाद मिटला...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com