Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच एकमेकावर करण्यात येणाऱ्या आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीपासून वेगळया झालेल्या रासपने विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 26) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
यामध्ये गंगाखेडमधून रत्नाकार गुट्टे तर अहमदपूर मतदार संघातून बब्रुवान खंदाडे यांच्यांसह 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ( RSP Candidate List News )
गंगाखेड - आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, अहमदपूर - आ. बब्रुवान खंदाडे, भोकर - साहेबराव बाबा गोरटकर, कळंब धाराशिव - श्रीहरी वसंत माळी, परांडा - डॉ. राहुल भीमराव घुले, परभणी - सावित्री सतीश महामुनी चकोर, मुखेड - विजयकुमार भगवानराव पेठकर, हदगाव हिमायतनगर अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे, नायगाव - हनुमंतराव मारोतराव वनाळेकर, बारामती- संदीप मारुती चोपडे, अक्कलकोट - सुनील शिवाजी बंडगर, राहुरी - नानासाहेब पंढरीनाथ जुधारे, अंबरनाथ - रुपेश थोरात, निलंगा - नागनाथ बोडके, इंदापूर - तानाजी उत्तम शिंगाडे, देगलूर - श्याम बाबुराव निलंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
पैठण - प्रकाश उत्तमराव दिलवाले, वैजापूर गंगापूर - बाबासाहेब कचरू राशिनकर, कराड उत्तर - सोमनाथ रमेश चव्हाण, पुरंदर - संजय शहाजी निगडे, भोर - रामचंद्र भगवान जानकर, खानापूर आटपाडी- उमाजी मोहन चव्हाण, कोल्हापूर दक्षिण - विशाल केरू सरगर, पन्हाळा शाहूवाडी - अभिषेक सुरेश पाटील, इचलकरंजी- प्रा. सचिन किरण बेलेकर, सातारा - शिवाजी भगवान माने, आंबेगाव - योगेश पांडुरंग धरम, कोथरूड - सोनाली उमेश ससाणे, कसबा पेठ - शैलेश रमेश काची, वडगाव शेरी - सतीश इंद्रजीत पाण्डेय, मागाठाणे - जिवाजी लेंगरे, जोगेश्वरी पूर्व - विजय पतिराम यादव, कांदिवली - ओमप्रकाश सोनार, दिडोशी - राकेश लालमनी यादव, नालासोपारा - नरसिंह रमेश आदावळे, वसई - हरिशंकर शेषनारायण जयस्वाल, सांगोला - सोमा उर्फ आबा गुलाब मोटे, वर्सोवा - मेहक चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बार्शी - किशोर परमेश्वर गाडेकर, करमाळा - विकास शिवाजी आलदर, पनवेल - सुदाम शेठ जरग, भोसरी - परमेश्वर बुरले, अकोले - पांडुरंग नानासाहेब पथवे, साक्री - अनिता धनराज बागुल, ब्रह्मपुरी - संजय शंकर कन्नवार, कर्जत - बळीराम एडकर, देवळी - अश्विनी गोविंद शिरपूरकर, मलकापूर - प्रवीण लक्ष्मण पाटील, रिसोड - दीपक श्रीराम तिरके, अकोला पश्चिम - इमरान मिर्झा, बाळापुर - विश्वनाथ जावरकर, सिंदखेडराजा - दत्तू रामभाऊ चव्हाण, यवतमाळ - धरम दिलीपसिंग ठाकूर, दिग्रस - डॉ. श्याम फलसिंग चव्हाण, उमरखेड - प्रज्ञेश रुपेश पाटील, बडनेरा - संजय महाजन, कारंजा मानोरा - संतोष हरिभाऊ दुर्गे, कामठी - नफीस अब्दुल अलीम शेख, निफाड - शंकर एकनाथ साबळे, अकेत्रले - पांडुरंग नानासाहेब पथवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये 65 उमेदवारांचा समावेश आहे. रासपने पहिल्याच यादीत 65 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काळात माजी मंत्री महादेव जानकर आणखी किती उमेदवारांची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.