Nagpur Political News : भाजपकडे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्यात महायुतीमुळे अनेक जागा सोडाव्या लागत असल्याने भाजपमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
काहींनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केले आहेत. याची गंभीर दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. पक्षातर्फे अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महायुतीचे 277 जागांवर एकमत झाले आहेत. उर्वरित जागांचा निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येणार आहे. त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चा बंद होती. भाजपच्या उमेदवारांची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे.
कदाचित एखादी यादी आज रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणी घाई करू नये, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन करून चंद्रशेखर बाबवनकुळे यांनी बंडखोरांना अप्रत्यक्ष कारवाईचा इशारा दिला आहे.
नागपूर शहरात प्रत्येक जागेसाठी पाच ते आठ इच्छुकांनी नावे पक्षाकडे आली आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची या निर्णय भाजपच्या (BJP) केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा असतो. मेरिटनुसार सर्व ठरवल्या जाते. त्यामुळे कोणीही पक्षाच्या विरोधात जाऊन उमेदवारी दाखल करू नये असेही त्यांनी बजावले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. सध्या 13 मतदारसंघात त्यांच्या प्रचार सभा निश्चित झाल्या आहेत. यात मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड, धुळे, नवी मुंबईचा समावेश आहे. इतर शहरांच्या नावे ठरवली जात आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने नागपूर जिल्ह्यात एकाही जागेवर दावा केलेला नाही. सर्व बारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लढणार आहेत. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांना स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा विरोध आहे. चंद्रपूर जिल्हाचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून आहेत. ते चर्चेतून योग्य निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.