Congress Meeting News: सत्यपाल मलिक यांच्या सभा घेत काॅंग्रेस भाजपला घाम फोडणार..

BJP News: भाजप हा ओबीसी समाजाचा शत्रू आहे. आमचे आरक्षण, आमची शिष्यवृत्ती भाजपला बंद करायची आहे.
Congress will hold Maliks meeting News
Congress will hold Maliks meeting NewsSarkarnama

Marathwada Political News : पुलवामा दुर्घटना प्रकरणात गंभीर आरोप करून भाजपला अडचणीत आणणारे जम्मू-काश्‍मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. (Congress will hold Maliks meeting) त्यांच्या किमान पाच सभा आगामी काळात होतील, असे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Congress will hold Maliks meeting News
Dhiraj Deshmukh Meets Nitin Gadkari : लातूरकरांचे प्रश्न घेऊन धिरज देशमुख गडकरींच्या दरबारात..

कॉंग्रेसच्या (Congress) ओबीसी विभागाची मराठवाडास्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर घेण्यात आली. भाजपने देशातील जनतेवर अन्याय केला आहे, जनतेची फसवणूक केली आहे, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी सत्यपाल मलिक यांच्या सभा घेतल्या जातील. (Satyapal Malik) भाजप हा ओबीसी समाजाचा शत्रू आहे. आमचे आरक्षण, आमची शिष्यवृत्ती भाजपला बंद करायची आहे.

आता रोहिणी आयोग आणला आहे, त्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे, या आयोगाच्या शिफारशी आम्ही देशात लागू होऊ देणार नाही, असा इशारा माळी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला. (BJP) यापूर्वीच्या महामंडळांना पैसा नाही, कार्यालय नाही, कर्मचारी नाहीत, असे असताना आता आणखी काही समाजासाठी महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे, ही एक प्रकराची फसवणूक असल्याची टीकाही माळी यांनी केली.

संपूर्ण देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ३५ टक्के घटनात्मक आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात यावे, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून निधी उपलब्ध करून द्यावा, `महाज्योती` चे विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्याचे माळी म्हणाले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॉंग्रेसने आत्तापर्यंत का निर्णय घेतला नाही, अशी विचारणा केली असता, कॉंग्रेसची ती चूक झाली, असे त्यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com