Raksha Khadse : खडसेंच्या मुलीची छेड; आरोपींचे 'शिवसेना' कनेक्शन; CM फडणवीसांची शिंदेंसमोरच कबुली

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्यासह पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raksha Khadse
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्यासह पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम माळी, किरण माळी, अतुल पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत चौघांना अटक केल्याची माहिती आहे.

दरम्यान, यातील काही आरोपींचे शिवसेना (Shivsena) कनेक्शनही उघडकीस आले आहे. अनिकेत भोई याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद आहे. अनिकेतला अटक केली असून, तो शिवसेना आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचा कट्टर समर्थक असलेल्या छोटू भोई यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. तर पीयूष मोरे शिवसेनेचा स्थानिक माजी नगरसेवक आहे. हे कार्यकर्ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचे असल्याबाबत खु्द्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कबुली दिली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raksha Khadse
Santosh Deshmukh Case : धक्कादायक! संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर

"दुर्देवाने या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट काम केले आहे. या प्रकरणी संशयितांवर कडक कारवाई केली जाईल," असे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री रक्षा खडसे यांनीही हे टवाळखोर एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कबुलीचा आणि खडसे कुटुंबियांच्या आरोपांचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच असल्याची चर्चा आहे.

नेमके काय घडले?

मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त गत आठवड्यात यात्रा सुरू होती. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) रात्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी यात्रेत गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर सुरक्षा रक्षक म्हणून एक पोलिस कर्मचारीही होता. यात्रेत फिरत असताना, काही टवाळखोर तरुण या मुलींचा पाठलाग करीत होते. या मुली पाळण्यात बसल्यावर हे टवाळखोरही त्या पाळण्यात बसले. शिवाय मोबाईलवरून मुलींचे व्हिडिओ काढू लागले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raksha Khadse
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी चौघांना अटक, एका अल्पवयीनचा समावेश

मुली आणि हे टवाळखोर पाळण्यातून उतरल्यावर सुरक्षा रक्षकाने या तरुणांना जाब विचारला. त्यांचा मोबाईल तपासला असता, त्या पोलिस कर्मचाऱ्यालाही या टवाळखोरांनी कॉलर पकडून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. रविवारी (2 फेब्रुवारी) सकाळी मुक्ताईनगरला आल्यावर रक्षा खडसे यांनी मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर फिर्याद दिली. या टवाळखोरांना अटक करा म्हणून पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com