
Jalgaon News : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पुण्यात स्वारगेट बस स्थानकात एका तरूणीवर झालेल्या बलात्कार आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची झालेली छेडछाड सत्ताधारी महायुतीची अडचण वाढवणाऱ्या घटना ठरल्या आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची टीका आता विरोधक सरकारवर करत आहेत. घटना घडून दोन दिवस ओलांडल्यानंतरही कारवाई न झाल्याने रक्षा खडसे उद्विग्न झाल्या होत्या. तर याप्रकरणी त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा मुद्द्याला हात घातला होता. यानंतरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांनी चौघांना या छेडछाडीप्रकरणी सात आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही इतर मुलींची छेड काढण्यात आली होती. यानंतर केंद्रीय मंत्र्याची मुलगीच सुरक्षित नसेल तर इतर मुलींचे काय’, असा सवाल सर्वसामान्यांना पडत आहे. तर हाच प्रश्न विचारत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली होती. तसेच तक्रार देऊनही मुलीबरोबर छेडछाड काढणाऱ्यांना अटक न झाल्याने खुद्द मंत्र्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली होती. ज्यानंतर आता गृहमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग देत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण अद्याप तिघांचा शोध सुरू आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये सात जणांच्या टवाळखुरांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची छेडछाड केली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश असून एका अल्पवयीनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिकेत भोई पियुष मोरे सोम माळी अनुज पाटील आणि किरण माळी या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी अनिकेत भोई हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली होती.
मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींचे टवाळखुरांनी छेडछाड केली. या प्रकरणानंतर विरोधकांनी थेट सरकारला आरोप करत टीका केली होती. यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत या प्रकरणात एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचे वक्तव्य केलं होतं. तर या प्रकरणात छेडछाड करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा तीव्र इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत सातपैकी चौघांना अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.