S.T. Fare : प्रवाशांसाठी 'गुड न्यूज'; 'एसटीची' भाडेवाढ रद्द, एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर प्रताप सरनाईकांची घोषणा

S.T. Fare : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
Eknath Shinde ST staff meeting
Eknath Shinde ST staff meetingSarkarnama
Published on
Updated on

S.T. Fare : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली. या घोषणनेनंतर एसटीला सुमारे 15 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागणार आहे.

गणेशोत्सव, आषाढी यात्रा या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांना गावी जाणे सोपे व्हावे म्हणून एसटीकडून अतिरिक्त बस सोडल्या जातात. यासाठी भाविकांकडून गट आरक्षण केले जाते. हे गट आरक्षण एकेरी असते. म्हणजेच केवळ गावी जाण्यासाठीचे आरक्षण असते. त्यामुळे माघारी येताना या बसेस रिकाम्या आणाव्या लागतात. याचा एसटीला मोठा आर्थिक फटका बसतो.

हा आर्थिक भुर्दंड भरुन काढण्यासाठी एसटीकडून यंदा एकेरी गट आरक्षणावर 30 टक्के भाडेवाढ केली होती. त्यावर प्रवाशांनी कमालीची नाराजी व्यक्त केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही भाडेवाढ रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली.

Eknath Shinde ST staff meeting
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

महामंडळामध्ये सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि विविध घटकांअंतर्गत 32 सवलत योजना लागू आहेत. यातून सवलत दिली जाते. अशात एकेरी गट आरणक्षामुळेही मोठा तोटा सहन करावा लागत होता. शिवाय इतर ठिकाणहूंन बसेस वळवाव्या लागलात. त्यामुळे तिथेही बससेची संख्या कमी पडते. त्यामुळे तोट्याचा आकडा वाढणार आहे.

Eknath Shinde ST staff meeting
Manikrao Kokate Politics: भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप, माणिकराव कोकाटे यांनाच कृषी खाते नको असावे!

गतवर्षी 12 कोटी रुपयांचे नुकसान :

गतवर्षी महामंडळाने सुमारे साडे चार हजार अतिरिक्त बसेस सोडल्या होत्या. यात एकेरी गट आरक्षणामुळे एसटीला सरासरी 12 कोटी रुपयांचा फटका बसला होता. यावर्षी हा आकडा 15 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com