Girish Mahajan News: गिरीश महाजनांनी एका झटक्यातच खडसे-राऊतांच्या आरोपांचा बार फुसका ठरवला; म्हणाले, उद्धव ठाकरे, शरद पवार...

Maharashtra Honey Trap Scandal : मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक केली आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी महाजनांवर आरोपांची सरबत्ती केली होती.
Girish Mahajan eknath khadse sanjay raut .jpg
Girish Mahajan eknath khadse sanjay raut .jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राज्याच्या राजकारणात सध्या 'हनी ट्रॅप'च्या आरोपांनी मोठी खळबळ उडवली आहे. या हनी ट्रॅपमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह 70 पेक्षा अधिक बडे प्रशासकीय अधिकारी अडकल्याची धक्कादायक आरोप केला जात आहे. याचप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करतानाच मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक केली आहे

यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी महाजनांवर आरोपांची सरबत्ती केली होती. आता महाजनांनी याच आरोपांवर पलटवार करताना लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, अजितदादा पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत लोढाचे फोटो असल्याचं सांगितलं आहे.

मंत्री गिरीश महाजनांनी सोमवारी (ता. 21) त्यांच्या मोबाईलमधील प्रफुल्ल लोढा याच्यासोबत अनेक नेत्यांसोबत असलेले फोटोच दाखवले. तसेच लोढाचा उद्धव ठाकरे, शरद पवार, अजितदादा,जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा पण हनी ट्रॅपशी संबंध आहे का? या सर्वांची पण आता सीबीआय आणि एसआयटी चौकशी करायची का? असा सवालही गिरीश महाजन यांनी खडसे आणि संजय राऊतांना केला आहे.

गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ते याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करत आहेत, पण काही वर्षांपूर्वी लोढानं खडसेंच्या मुलाच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली होती. तेव्हा आपण खडसेंसोबत होतो, मग त्या प्रकरणाची आता चौकशी करायची का? असा अडचणीत आणणारा सवालही मंत्री महाजन यांनी खडसेंना केला.

Girish Mahajan eknath khadse sanjay raut .jpg
Praful Lodha: 'हनी ट्रॅप' प्रकरणात मोठा ट्विस्ट, खडसेंनी अखेर 'तो' खळबळ उडवून देणारा व्हिडिओ समोर आणलाच; महाजनांना धक्का?

महाजन म्हणाले, कोणत्याही प्रकरणात खडसे माझा संबंध जोडून माझी बदनामी करतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पण मी खालच्या पातळीवर जाणार नाही. लोढाला पोलिसांनी अटक केली आहे, त्याची चौकशी पोलीस करतील. जे सत्य आहे ते समोर येईलच, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो. काही वर्षापूर्वी व्हिडिओ बघितले होते प्रफुल्ल लोढा अत्यंत खालच्या भाषेत एकनाथ खडसे यांना बोलताना दिसत आहे. त्याला काय म्हणावं असा खोचक टोलाही महाजनांनी यावेळी लगावला.

Girish Mahajan eknath khadse sanjay raut .jpg
Girish Mahajan Politics : उज्वल निकम यांची नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल ; गिरीश महाजनांनी दिले मोठे संकेत : रक्षा खडसेंच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर गिरीश महाजन आणि प्रफुल लोढांचा एकत्र फोटो शेअर करत गंभीर आरोप केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात 'हनी ट्रॅप'चे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक दावा केला होता.

तर प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, त्यामुळे एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली होती.

Girish Mahajan eknath khadse sanjay raut .jpg
Manikrao Kokate : अधिवेशनात हजेरीपुरतेच आले, त्यातही रमी खेळताना सापडले… कोकाटे अधिवेशनात शेवटपर्यंत सिरियस दिसलेच नाहीत !

तसेच प्रफुल लोढावर दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आणली आहे. त्यात त्यांनी साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहितीही खडसेंनी यावेळी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com