Manikrao Kokate : अधिवेशनात हजेरीपुरतेच आले, त्यातही रमी खेळताना सापडले… कोकाटे अधिवेशनात शेवटपर्यंत सिरियस दिसलेच नाहीत !

Manikrao Kokate Assembly : कृषी मंत्र्यांची असलेली अनुपस्थिती सातत्याने विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी आमदारांनाही खटकत होती. कोकाटे कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला गेला होता.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला ३० जून रोजी सुरुवात झाली होती. १८ जुलै रोजी या अधिवेशनाचे सूप वाजले. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील कृषिविषयक मुद्द्यांवर विधानसभेच्या दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र असे असतानाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अपवाद वगळता सभागृहात दिसलेच नाही. खऱ्या अर्थाने ते डायरेक्ट १० जुलैला सभागृहात प्रकटले.

विरोध पक्षांसह सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी कृषीविषयक प्रश्नांवर लक्षवेधी मांडल्या. अगदी पहिल्या आठवड्यापासूनच राज्यातील खरिपाचे पीक अडचणीत येण्याची शक्यता असेल, बोगस बियाण्यांचा वाढता सुळसुळाट असेल, खत लिंकिंग, पिक विम्याची भरपाई आणि इतर कृषिविषयक मुद्द्यांवर विधानसभेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होत होती. प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र या दरम्यान कृषी मंत्र्यांची असलेली अनुपस्थिती सातत्याने विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी आमदारांनाही खटकत होती.

विधानसभेच्या सभागृहात २९३ अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री, जलसंधारण मंत्री तर सोडाच सचिवही सभागृहात हजर नसल्याने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार संतापले होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सभागृहात हजर होते. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. सुमारे पन्नास मिनीटे सभागृहात गदारोळ झाला होता. यावेळी विरोधक कोकाटेंवर तुटुन पडले होते. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केली होती. कोकाटे कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला गेला.

Manikrao Kokate
Manikrao Kokate : एक्का, दुर्री, तिर्री... दोन प्रकरणांमध्ये वाचलेले कोकाटे तिसऱ्या प्रकरणात 'पॅक' होणार?

मात्र, विधिमंडळांच्या सभागृहात माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन विधिमंडळाच्या सभागृहात बैठक लावली होती. तिथे मंत्री कोकाटे उपस्थित दिसले. परंतु इकडे पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित नसल्याने 'कृषी'शी संबधित लक्षवेधी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली होती.

या सगळ्या प्रकारानंतर 10 जुलै'ला माणिकराव कोकाटे अधिवेशनात दाखल झाले. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही वेगवेगळ्या प्रश्नांवरुन त्यांना लक्ष्य केलं. फार फार तर अवघे चार ते पाच दिवस ते अधिवेशनाला हजर राहिले असतील. मात्र त्यातही ते आता वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु असताना कोकाटे रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला. त्यामुळे कोकाटे हे अधिवेशनात शेवटपर्यंत सिरियस दिसलेच नाहीत असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.

Manikrao Kokate
Girish Mahajan Politics : उज्वल निकम यांची नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल ; गिरीश महाजनांनी दिले मोठे संकेत : रक्षा खडसेंच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार?

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात गेम खेळतात. त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. यापूर्वीही कोकाटे सातत्याने शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. त्यावेळीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यामुळे आता कोकाटेंबाबत अजित पवार यावेळी काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com