Parbhani Violence News : परभणी दंगल प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश!

Three police officers to be sent on compulsory leave in Parbhani violence case : धर्मपाल मेश्राम हे आज परभणी दौऱ्यावर होते. संविधान विटंबना घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. तसेच मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
Parbhani News
Parbhani NewsSarkarnama
Published on
Updated on

परभणी : परभणी (Parbhani) येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे. हे प्रकरण हाताळतांना योग्य काळजी घेतली नाही, अशी कबुली देत राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी हे आदेश दिले आहेत.

तसेच विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचारात ज्या व्यापाऱ्यांचे नूकसान झाले आहे त्यांना विना एफआरआय मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परभणीत संविधान विटंबना झाल्यानंतर जो प्रकरार घडला त्यावेळी (Police) पोलीस प्रशासनाने जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. त्यामुळे जनतेचा रोष ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मेश्राम यांनी पत्रकरांना सांगितले.

Parbhani News
Parbhnai Riot News Update : परभणी दंगल प्रकरणी अटकेत तरुणाचा मृत्यू!

धर्मपाल मेश्राम हे आज परभणी दौऱ्यावर होते. संविधान विटंबना घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. तसेच मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात काळजी घ्यायला हवी होती, ती घेण्यात आली नाही.

Parbhani News
Parbhani Violence : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; आंबेडकरांकडून 'तो' फोटो व्हायरल

तसेच ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर लोकांचा सर्वाधिक राग आहे, त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले असल्याचे मेश्राम यांनी सांगितले. तसेच विटंबना प्रकरणानंतर झालेल्या हिंसक आंदोलनात ज्या व्यापाऱ्यांचे नूकसान झाले आहे त्या सगळ्यांना मदत देण्याचे निर्देश दिल्याचे मेश्राम यांनी सांगितले. कुठल्याही एफआरआय शिवाय ही मदत दिली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

Parbhani News
Parbhani Riot News : माथेफिरूकडून संविधान प्रतिकृतीची विटंबना, परभणीत दंगल उसळली!

परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन करत बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान शहरातील अनेक भागात हिंसाचार उसळला होता. दुकाने, वाहनांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली होती. जमावाने अनेक वाहने, परिवहन मंडळाच्या बसेसचे नुकसान केले होते. या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा नुकताच मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com