Gopichand Padalkar Vs NCP: गोपीचंद पडळकरांंनी अजितदादांच्या नेत्याला पुन्हा डिवचलं; म्हणाले, 'या बिनडोक लोकांना...'

Gopichand Padalkar Reply To NCP Leader Suraj Chavan : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अजित पवारांना धनगर समाजाच्या कार्यक्रमाला न बोलावण्याच्या घेतलेल्या भूमिकेवरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना सुनावलं होतं. तसेच त्यांचा शेखचिल्लीची उपमाही दिली होती.
Gopichand Padalkar VS Ajit Pawar NCP
Gopichand Padalkar VS Ajit Pawar NCP Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त होत असलेल्या होणाऱ्या'धनगरी नाद'या कार्यक्रमावरुन सत्ताधारी महायुतीत मोठा वादंग निर्माण झाला आहे. भाजप आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील मित्रपक्षाचे प्रमुख नेते असलेल्या अजित पवारांविरोधातच थेट भूमिका घेतल्यामुळे नवा राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर असा सामना रंगला आहे. त्यातच पडळकरांनी थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते सूरज चव्हाणांनाच फटकारलं आहे.

पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या 'धनगरी नाद' कार्यक्रमाचं गृहमंत्री अमित शाह यांना विशेष निमंत्रण देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमंत्रित करतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) या कार्यक्रमासाठी बोलवणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

त्याचवरुन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं आहे. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी पडळकरांवर टीका करताना त्यांचा उल्लेख शेख चिल्ली असा करतानाच चोरी, दरोडे असाही संदर्भ जोडला होता. आता त्यांच्या टीकेला पडळकर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Gopichand Padalkar VS Ajit Pawar NCP
Kolhapur Politics : संजय घाटगेंचा भाजप प्रवेश; मुश्रीफ अन् फडणवीसांनी मिळून केला समरजीत घाटगेंचा कार्यक्रम!

गोपीचंद पडळकर म्हणाले, या बिनडोक लोकांना माहिती नाही, मी 22 व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो.तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येतं नव्हती.हे आपल्याला दरोडेखोर म्हणतात,तसेच मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, पण हे सगळं राष्ट्रवादीचंच काम असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार 2009 साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला. मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते. ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो. तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप असल्याचं सांगत पडखळकरांनी पाठीमागचा सगळा इतिहासच काढला.

Gopichand Padalkar VS Ajit Pawar NCP
Sangram Thopate News: पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? तीनवेळा आमदार राहिलेला नेता काँग्रेसची साथ सोडणार, भाजप प्रवेशाची तारीखही ठरली ?

माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार 2009 साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला. मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते. ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो. तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप असल्याचं सांगत पडखळकरांनी पाठीमागचा सगळा इतिहासच काढला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अजित पवारांना धनगर समाजाच्या कार्यक्रमाला न बोलावण्याच्या घेतलेल्या भूमिकेवरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना सुनावलं होतं. तसेच त्यांचा शेखचिल्लीची उपमाही दिली होती.

Gopichand Padalkar VS Ajit Pawar NCP
Neelam Gorhe News : 'स्थानिक'साठी शिवसेनेनं पहिला पत्ता खोलला? नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान; म्हणाल्या,...म्हणून युती होणं अवघड!

चव्हाण म्हणालेले, गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता, तसा हा शेखचिल्ली महायुतील्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित आहे की, पवारांना विरोध केला तरचं राजकीय जिवंत राहू शकतो.पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला होता.

तसेच,अजित दादा पवार यांनी अनेक भाषणामध्ये अनेकवेळा सांगितले आहे. पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी, राजकीय पार्श्वभूमी चोरी, दरोडेखोरीची नसावी. स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत गोपीचंद पडळकरांनी केली नसावी,असं खोचक टोलाही राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com