Kolhapur Politics : संजय घाटगेंचा भाजप प्रवेश; मुश्रीफ अन् फडणवीसांनी मिळून केला समरजीत घाटगेंचा कार्यक्रम!

Sanjay Ghatge : अखेर कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र, गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

अखेर कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र, गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने घाटगे पिता-पुत्राचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

दुसऱ्या बाजूला संजय घाटगे यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र हसन मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला.

Kolhapur Politics
Kolhapur politics : समरजीत घाटगेंचा राग फडणवीसांच्या डोक्यातून जाईना...; संजय घाटगेंसाठी उघडलं भाजपचं दार

या पराभवानंतर समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये परतण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा होत्या. पण विधानसभा निवडणुकीत समजूत काढून न ऐकल्याचा राग मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोक्यात असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच वरिष्ठांकडून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे समजते. पण त्याचवेळी संजय घाटगे आणि त्यांच्या पुत्राला भाजपचे दार उघडल्याने समरजीत घाटगे यांची राजकीय कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे.

कोण आहेत संजय घाटगे?

संजय घाटगे हे 1998 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यांनी हसन मुश्रीफ यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेस, 2004 मध्ये शिवसेना 2009 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, 2019 आणि 2019 मध्ये शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला.

यावेळी मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना मदतीची भूमिका घेतली होती. त्या बदल्यात त्यांची हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून वर्णी लागली. पण त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता होती.

Kolhapur Politics
Kolhapur Police : PSI नेच उरकली 3 लग्न; बायकोच्या तक्रारीनंतर अंगावरची खाकी गायब: दाखवला घरचा रस्ता

आज घडीला अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून संजय घाटगे यांचा प्रबळ गट तालुक्यात सक्रिय आहे. अशात समरजीत घाटगे यांच्या जाण्याने भाजपमध्ये तालुक्यात नेतृत्वाची पोकळी तयार झाली होती. त्यातून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला ताकद देऊ असे आश्वासन घाटगे यांना दिले होते.

आता संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात झालेली मैत्री, आणि दोघेही महायुतीतच आल्याने तालुक्यात महायुतीची ताकद वाढली आहे. तर समरजीत घाटगे सत्तेत नसलेल्या शरदचंद्र पवार पक्षासोबत असल्याने तालुक्यातील गट जिवंत ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना तूर्तास भाजपची दारे बंद असल्याने आगामी काळात स्थानिक राजकारणात अडचण होण्याची शक्यता आहे.

हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न :

माजी आमदार संजय घाटगे यांना भाजपपर्यंत घेऊन जाण्याच्या निर्णयामागे कोणाचा हात आहे? याची दबक्या आवाजात कागल मध्ये चर्चा सुरू आहे. गोकुळ शिरगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात या प्रश्नावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ त्याने हसत हसत उत्तर दिले होते. त्यानंतरच घाटगे यांच्या या निर्णयामागे कोणाचा हात आहे याचा अर्थ उलगडला होता. पण शेवटी घाटगे यांची भूमिका त्यांची स्वतःची भूमिका आहे असे म्हणत त्यावर पडदा टाकला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com