Neelam Gorhe News : 'स्थानिक'साठी शिवसेनेनं पहिला पत्ता खोलला? नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान; म्हणाल्या,...म्हणून युती होणं अवघड!

Mahayuti Politics : पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन हून अधिक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आतुरतेने निवडणुकांची वाट पाहत आहेत.
Eknath Shinde Neelam Gorhe
Eknath Shinde Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन हून अधिक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आतुरतेने निवडणुकांची वाट पाहत आहेत. असं असलं तरी आगामी निवडणुकांमध्ये युती आणि आघाडी होणार का? याबाबत सर्वच स्थानिक कार्यकर्त्यात पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

अशातच शिंदेंचा शिवसेनेचा नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मुंबई आणि ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड असल्यास सांगितलं आहे. त्यांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही खुशी काही गम पहिला मिळत आहे.

पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सदस्य नोंदणीचा शुभारंभाचा कार्यक्रम गुरुवारी(ता.17) पार पडला. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबंधित करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशा पद्धतीने होईल याचा विचार करण्यापेक्षा आपण ज्या भागात राहतो, त्या भागामध्ये काम सुरू करणे आवश्यक आहे.

Eknath Shinde Neelam Gorhe
Supreme Court Stay Waqf Act : मोठी बातमी! वक्फ कायद्यातील तरतुदींना स्थगिती, मोदी सरकारची कोर्टात माहिती

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये युती होईल का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मला वाटत नाही की, पुणे महापालिकेमध्ये युती होईल. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड आहे. युती झाली तर आनंद आहे. मात्र, त्यावरती अवलंबून न बसता कामाला मागण्याची आवश्यकता असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

बारामती, शिरूर यांसारख्या मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांची ताकद आहे. त्या ठिकाणी ते स्वबळाचा विचार करू शकतात. मात्र, ज्या पद्धतीने डीपीसीमध्ये निधीबाबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यामध्ये तीस-तीस, वीस चा फॉर्म्युला ठरला आहे. याच प्रकारचा फॉर्म्युल्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठरला तर ते चांगलंच असेल. मात्र, आतापासूनच बंडखोरीचा विचार मनात येत असेल तर सोडून द्या अशा नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Eknath Shinde Neelam Gorhe
Ahilyanagar Karjat : नगराध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर घाई? प्रशासनानं सुनावणीची तारीख घेतली अलीकडं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर उरलेल्या 50% सर्वसाधारण जागांमध्ये चार कॅटेगरीच येतात. सर्वसाधारण एससी, एसटी आणि ओबीसी त्यामुळे प्रत्येक महापालिका क्षेत्रातील प्रभागासाठी संभाव्य आठ उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यामुळे आरक्षण निश्चित झाल्यानंतर त्यातील एक उमेदवार निश्चित होईल. मात्र प्रत्येक प्रभागांमध्ये पर्यायी उमेदवार उभा करणे आवश्यक असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com