
Mumbai News : पुणे,मुंबई,कोलकाता,सांगली यांसह विविध ठिकाणच्या महिला आमि चिमुरडींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांनी महाराष्ट्रासह देशभरातच महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच जगभरात शनिवारी(ता.8 मार्च) जागतिक महिला दिन साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व ग्रामपंचायती कौतुकास्पद पाऊल टाकणार आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत. या ग्रामसभेत महिलांच्या सुरक्षिततेसह अनेक महत्त्वपूर्ण ठराव करण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अपर सचिवांनी देशभरातील सर्वच राज्यातल्या ग्रामविकास सचिवांना 21 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र धाडलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून या निर्देशानुसार सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती 28 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य महिला आयोगाने ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे दिली होती. यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदांना जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश गुरुवारी (ता.6) दिले होते.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत असतानाच राज्यात प्रथमच महिलांच्या विषयांकरिता अशी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय झाल्यानं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड ठरणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष ग्रामसभेत होत असलेल्या महिलांविषयीचे ठराव संपूर्ण गावासह सरकारी पातळीवर करण्यात आल्यास महिलांना सन्मानानं वागवण्याची कर्तव्यभावना आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलेल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी म्हटलं.
राज्यातल्या सर्वच ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या विशेष ग्रामसभेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती,पतीच्या निधनानंतर महिलांसाठीच्या जाचक प्रथा बंद करणे,बालविवाह रोखण्यासाठी कठोर पावलं उचलणं,गावात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठीचे प्रयत्न,महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना असे एक ना अनेक ठराव करण्याचा प्रयत्न असल्याचंही चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.