Maharashtra Assembley Election : महाविकास आघाडीला मोठा दिलासा तर महायुतीसाठी धोक्याची घंटा; आणखी एक सर्व्हे आला समोर

Political News : प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता लागली असतानाच लोकपोलचा सर्व्हे आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीची धाकधूक वाढली आहे.
MVA- Mahayuti
MVA - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच दिवसाचा कालावधी उरला आहे. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात रंगतदार आला आहे. निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावल्याने चुरस वाढली असून आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता लागली असतानाच लोकपोलचा सर्व्हे आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीची धाकधूक वाढली आहे. (Maharashtra Assembley Election News)

लोकपोलच्या या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसला घवघवीत यश मिळेल, असा अंदाज आहे. राज्यात येत्या काळात काँग्रेस (Congress) पक्ष भाजपला (Bjp) पर्याय म्हणून समोर येईल, असे लोकपोलच्या सर्व्हेतून अंदाज वर्तविण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 151 ते 162 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करणार असल्याने येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

MVA- Mahayuti
Goa CM Pramod Sawant : 'उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थामुळे...' ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला निशाणा!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 37 ते 40 टक्के, तर महाविकास आघाडीला 43 ते 46 टक्के मते मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. राज्यातील मतदार ध्रुवीकरणाचे प्रयत्न उधळून लावत दैनंदिन आयुष्याशी निगडीत मुद्द्यांवरुन मतदान करतील, असा लोकपोलचा सर्व्हे सांगतो. मताचे ध्रुवीकरण होणार नसल्याने या निवडणुकीत त्याचा आघाडीला फायदा होणार आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसारख्या पक्षांना फारशी चमक दाखवता येणार नाही. पण महायुती आणि मविआसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान असेल, असा अंदाज आहे.

MVA- Mahayuti
Narendra Modi : पीएम मोदींनी घातली मुंबईकरांना भावनिक साद; म्हणाले, 'तुमची स्वप्ने हाच आमचा संकल्प'

राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. मतदार अनेक प्रश्नांसाठी, समस्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानतात. तर महायुतीमधील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे निष्कर्ष लोकपोलच्या सर्व्हेतून समोर आले आहेत. राज्यातील मतदार मतांच्या ध्रुवीकरणास फारसा प्रतिसाद न देता शेती, रोजगार, महिला सुरक्षा आणि महागाई या मुद्द्यांचा विचार करुन मतदान करेल, अशी माहिती सर्व्हेतून पुढे आली आहे.

MVA- Mahayuti
Nitin Gadkari : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का ? भाजपच्या नितीन गडकरींचं मोठं विधान

महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे युतीचे काही मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार महायुतीसाठी अडचणीचे ठरु शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे. विशेषतः ठाकरेसेनेला काँग्रेसच्या व्होट बँकवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे सर्व्हे सांगतो.

MVA- Mahayuti
Vinod Tawade : महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावंही येऊ शकतात; विनोद तावडेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com