
Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर येत आहे. बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी बरखास्त करताना कुठेतरी अजित पवारांनी पक्षावर सातत्याने होणारी टीका जरी थांबवली असली तरी कार्यकारिणी बरखास्त करण्याचे नेमके कारण आता समोर आले आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नसल्यामुळे अजूनही त्यांच्यावर राज्यभरातून दबाव निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप केले जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे आरोप या प्रकरणात होत आहेत. त्यासोबतच काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याचे देखील पुढे आले आहे. यामुळेच बीड जिल्ह्याची कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतला होता.
या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी मुंबईत असणाऱ्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयात तातडीने बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण यांना देखील बोलावले होते. त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 40 ते 45 पदाधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने पाहिले आहे.
दुसरीकडे या चौकशीच्या माध्यमातून तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची बाब देखील पुढे अली होती. त्यानंतर पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यकारणीवर जोरदार टीका देखील केली जात होती. चौकशीच्या निमित्ताने खुद्द पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीने होत असलेले हे आरोप गंभीर आहेत.
एकीकडे संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. विष्णू चाटे याचा थेट संबंध वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी असल्याची देखील जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळेच विष्णू चाटेसह जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे विविध पदाधिकारी यांना देखील पोलिसांनी चौकशीला बोलावलं होते.
या माध्यमांमधून पक्षाची पदाधिकारी चौकशीला जात असल्याची सातत्याने येणारी बाब पाहता पक्ष सातत्याने टीका होत असल्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कार्यकारणीच बरखास्त करण्याचा थेट निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात बोलावलं आणि जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यासोबतच यापुढे पक्षाचा कोणताही पदाधिकारी नेमायचा असेल तर त्याची चारित्र्य पडताळणी झाल्याशिवाय नेमणूक करायची नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते.
अजित पवारांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे पद सोडून बाकी सर्वांची कार्यकारणी बरखास्त करा, असे यावेळी सांगितले. यासोबतच पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे होत असून यावेळी अधिवेशन पार पडल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांना नियुक्त करा, असेही आदेश राजेश्वर चव्हाण यांना दिले होते. त्यातच आता राजेश्वर चव्हाण या संपूर्ण घटनेनंतर पदावर राहतील का? हे देखील शंका उपस्थित केली जात आहे.
बीडची कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेत अजित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर तातडीने बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची कार्यकारणी बरखास्त झाल्यामुळे धनंजय मुंडेंसाठी हा एक धक्का आहे, अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारानंतर धनंजय मुंडे बीड जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने परळीला रवाना झाले होते. त्यामुळे येत्या काळात आता नवीन कार्यकारिणीची निवड करताना अजित पवार काय काळजी घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.