
Mumbai News : मराठी आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर राज्यात रान उठवल्यानंतर राज्य शासनाला उपरती आली आणि हिंदी सक्ती करणारे दोन्ही निर्णय रद्द करावे लागले. यामुळे 5 जुलैला होणारा हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा टळला. पण त्या ऐवजी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकत्र विजयी मेळावा आज (ता. 5) मुंबईत घेतला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेनेवर तोफ डागली. यावरून आता जेष्ठ कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी देखील राज ठाकरेंना निशान्यावर घेतले असून राज ठाकरे खोटारडे असल्याची टीका केली आहे. तसेच त्यांची तुलना थेट रजा अकादमीच्या झाकीर नाईक यांच्याशी केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (After the Mumbai Thackeray unity rally, veteran legal expert Gunaratna Sadavarte criticizes Raj Thackeray as 'liar' and compares him to Zakir Naik)
मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकत्र विजयी मेळावा घेतल्यानंतर सदावर्ते यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना निशान्यावर घेत, 'राज ठाकरे, तुम आज भी झूठी बाते कर रहे हो. तुम झुठे हो, असा हल्लाबोल केला. तसेच राज ठाकरे याबाबत आपण पुरावे द्यायलाही तयार असल्याचेही ते म्हणाले.
'तुमच्या अवलादी नेमक्या कुठे शिकल्या याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण राज ठाकरे ऐका तुमचे पितळ मी उघडं करतोय. तुम्हाला हिंदी नको आहे पण इंग्रजीची गोडी आहे. तुमचा इंग्रजीला विरोध नाही, असेही आरोप राज ठाकरे यांच्यावर सदावर्ते यांनी केला आहे.
यावेळी सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची तुलना थेट रजा अकादमीच्या झाकीर नाईक यांच्याशी केली. राज ठाकरे हे भाषेच्या नावावर देश तोडायला निघाले का? ते अतिरेक्यांची भाषा करत असून पुरावेही कसे नष्ट करायचे हे झाकीर नाईक याच्या शाळेत शिकलेत का? आता झाकीर नाईक आणि राज ठाकरे सारखं बोलत असल्याचे वाटतं असून आम्ही एक कधीच होऊ शकत नाही.
व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी बोलणार नाही, शिकणार नाही असे विधान केलं होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर केडिया यांनी जाहीर माफी मागितली. पण आता त्यांच्या या माफिवर देखील सदावर्ते भाष्य केलं आहे. देशाच्या हितासाठीच केडिया यांनी त्रागा केला होता. पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे रोजगाराचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दगडाऐवजी तोडफोडीसाठी नारळाचा वापर केला. हे कोणत हिंदूत्व असल्याचा सवाल ही सदावर्ते यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.