Harish Pimple News : ...अन् भाजप आमदाराने पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच शासकीय विश्रामगृहात डांबलं!

Harish Pimple and Crop Insurance company employee : ...तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले जाईल, असा इशारा मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी दिला आहे.
Haris Pimple
Haris PimpleSarkarnama
Published on
Updated on

BJP MLA Harish Pimple : हिवाळी अधिवेशनात एक रुपयांत पीक विमा योजनेवरून भाजपच्या आमदारांनी महायुतीला धारेवर धरल्याचे बघायला मिळाले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोट्याळ्याशी संबंधित सुमारे हजार पानांचा बंच विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला होता.

आता अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरच्या आमदाराने चक्क पीक विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय विश्रामगृहात डांबून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जोपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात नाही, तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले जाईल. असा इशारा त्यांनी दिला असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

हिवाळी अधिवेशनात एक रुपया पीक विमा योजनेतील घोळ व भ्रष्टाचार चांगलाच गाजला होता. भाजपचे आमदार सुरेश धस(Sursh Dhas) यांनी जी शेतजमीन अस्तित्त्वातच नाही त्याही जागेचा पीक विमा काढून रक्कम लाटली गेल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. हा प्रकार ताजा असतानाच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना डांबून टोकाचे पाऊल उचलले आहे.

Haris Pimple
BJP Politics : भाजपच प्रदेशाध्यक्ष बदलणार, पण केव्हा? मंत्री बावनकुळेंनी सांगितली निवड प्रक्रिया...

आमदार पिपंळे म्हणाले, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आहे आणि लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत आहेत. मूर्तीजापूर तालुक्यातील 543 सोयाबीन उत्पादकांचे 2022मध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यांना पीक विमा योजनेंतर्गंत लाभ देण्याचे कंपनीने कबूल केले होते. या संदर्भात दोनवेळा अकोला जिल्हाधिकारी यांच्यासोबत कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. याबैठकीला आपण स्वतः उपस्थित होतो.

यानंतर तत्कालीन कृषीमंत्री यांच्या दालनातही बैठक झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी वन टू वन चर्चा करून भरपाई देण्याचे कबूल केले होते. मात्र अद्यापही भरपाई मिळाली नाही. अधिकारी पैसे जमा केल्याचे सांगत आहेत, वेबसाईटवर पैसे दिले असल्याचे दर्शवल्या जात आहे. प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नसल्याचे आमदार पिंपळे यांचे म्हणणे आहे.

Haris Pimple
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कशामुळे रखडल्या? बावनकुळेंनी सांगितलं कारण; अजितदादा...

केंद्र शासनाकडून पीक विमा कंपन्यांना हिस्सा देण्यात आला आहे. मात्र तो शेतकऱ्यांना दिला जात नाही. अधिकारी मूर्ख बनवत आहे. लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार पिंपळे यांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com