Kolhapur politics : 'प्रशासक मंडळ हरामखोर, जमत नसेल तर चालते व्हा!'; मंत्री हसन मुश्रीफांनी मालगावेंना झापले

Kolhapur dairy union News : प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे यांना फोनवरून चांगलेच झोडपून काढले. तर दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर प्रशासक मंडळाचे वाभाडे काढले.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ठराव दाखल करत असताना दुग्ध निबंधकांनी केलेली व्यवस्था पाहून मंत्री हसन मुश्रीफ चांगलेच संतापले. केलेली व्यवस्था पाहून मंत्री मुश्रीफ यांना राग अनावर झाला. प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे यांना फोनवरून चांगलेच झोडपून काढले. तर दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर प्रशासक मंडळाचे वाभाडे काढले.

मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या उपस्थितीत जवळपास 2018 उदाहरण सोबत घेऊन गोकुळचे ठराव दाखल करण्यासाठी दुग्ध निबंधक कार्यालयात गेले होते. मात्र, दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने प्रशासक मंडळाची भेट घेऊन करण्यात आलेली व्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे ही व्यवस्था पर्यायी करावी, अशी सूचना प्रशासक मंडळाचे सचिव प्रदीप मालगावे यांच्याकडे केली होती. मात्र आज ठराव दाखल करण्याच्या दिवशी प्रचंड गर्दी असूनही कोणतीच व्यवस्था न झाल्याने मंत्री मुश्रीफ हे चांगलेच संतापले.

Hasan Mushrif
Gokul Milk News: ना चौकशी, ना नोटीस; गोकुळच्या 427 संस्थांना अपात्र ठरवल्याने संताप, संस्था चालक न्यायालयात जाणार

दुग्धनिबंधक कार्यालय येथे आल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी पाहणी करून थेट प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे यांना फोन करून चांगलेच फैलावर घेतले. दोन दिवसांपूर्वी शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील आपण कोणतीच व्यवस्था केली नाही.

Hasan Mushrif
Gokul: गोकुळमध्ये महाडिक-मुश्रीफ भांडणात अधिकाऱ्यांचे अतोनात हाल; स्वतःला 'बादशाह' समजणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा

कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची तुम्ही वाट पाहत आहात का? जर ठराव धारकांचा संताप झाला आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर याला जबाबदार तुम्ही रहाल. तुम्हाला जमत नसेल तर प्रशासक मंडळातून निघून जा. आजचा दिवस जाऊ द्या, दोन दिवसानंतर तुमच्याकडे लक्ष देतो, असा शब्दांत मंत्री मुश्रीफ यांनी प्रदीप मालगावे यांना झापले.

Hasan Mushrif
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर देखील प्रशासक मंडळाबाबत रोष व्यक्त केला. हे प्रशासक मंडळ हरामखोर असून त्यांनी व्यवस्था करायला हवी होती. सूचना देऊन देखील प्रदीप मालगावे यांनी हे मुद्दाम केले आहे, असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला. दरम्यान ठराव दाखल करण्यासाठी ठराव धारकांची मोठी झुंबड उडाली.

Hasan Mushrif
Gokul: गोकुळमध्ये महाडिक-मुश्रीफ भांडणात अधिकाऱ्यांचे अतोनात हाल; स्वतःला 'बादशाह' समजणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com