

Pune News : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा इस्त्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पुण्यात देखील शोक आणि इस्त्रायल,अमेरिके विरोधातील रोष पाहायला मिळाला. कोंढवा परिसरात इराणी आणि इतर समुदायांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.
त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आता पोलिस सतर्क झाले आहेत. त्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून इराणी नागरिकांची माहिती देखील घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलीकडे च्या काळातील इराणी लोकांचा वास्तव पाहिल्यास शहरात सुमारे 120 ते 125 इराणी नागरिक वास्तव्यास आहेत.
पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि शैक्षणिक व्हिसावर ते पुण्यात आले आहेत. तर काही इराणी महिलांनी पुण्यातील नागरिकांशी विवाह केला आहे. अशा महिलांची संख्या सुमारे 25 ते 30 आहे. ज्या शहरात वास्तव्यास आहेत. तसेच, 60 इराणी विद्यार्थी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असल्याचा देखील समोर आला आहे.
अधिकृत आकडेवारी अलीकडच्या काळातील आहे. त्यामुळे या आकडेवारीपेक्षा मोठ्या संख्येने इराणी नागरिक पुण्यामध्ये राहत असण्याची शक्यता आहे. काही रिपोर्टनुसार व्यापार, शिक्षण, वैद्यकीय उपचार यासाठी आलेल्या इराणी नागरिकांबरोबरच गेल्या काही काळापासून पुण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या इराणी नागरिकांची संख्या 8000 पर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपुष्टात येत असल्यास ती वाढवण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, संबंधित विद्यार्थी आणि नागरिकांशी थेट संपर्क साधून व्हिसा मुदतवाढीची प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी माहिती विशेष शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्तीचे आदेश देण्यात आले असून, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास नागरिकांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्ष (क्रमांक ११२) किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.
सध्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायलचे युद्ध सुरू आहे. यामुळे सर्व जगभरामध्ये चिंतेचे वातावरण असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, काही संवेदनशील भागांमध्ये विशेष गस्त घालण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.