HSRP rules : तुमच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नाही? परिवहन विभागाचे नवे आदेश जारी; आजच करा हे काम नाहीतर...

How to apply for HSRP number plate online : HSRP नंबर प्लेटबाबत परिवहन विभागाने नवे आदेश जारी केले आहेत. कोणत्या वाहनांना HSRP प्लेट आवश्यक आहे, मुदत आणि नियम जाणून घ्या.
HSRP number plate latest rules in Maharashtra
HSRP number plate latest rules in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

HSRP number plate Maharashtra : राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाहनावर HSRP म्हणजेच High Security Registration Plate बसवलेली नसेल, तर आता संबंधित वाहनधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही मोठ्या संख्येने वाहनांवर जुन्या किंवा अनधिकृत नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून तपासणी आणि कारवाईवर भर दिला जात आहे.

परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 98 लाख 8 हजार वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र, अजूनही अनेक वाहनधारकांनी HSRP प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

HSRP number plate latest rules in Maharashtra
Farmer News : मोठा निर्णय: आता घरबसल्या मिळवा शेतीसाठी खत; काळाबाजाराला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारचा 'मास्टरप्लॅन'!

विशेष पथकांकडून वाहनांची तपासणी

HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी न केलेली वाहने तसेच जुन्या किंवा अनधिकृत नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाची विशेष पथके लक्ष ठेवणार आहेत. शहरांमधील प्रमुख रस्ते तसेच विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाऊ शकते. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनधारकावर नियमानुसार कारवाई होऊ शकते.

HSRP नंबर प्लेट इतकी महत्त्वाची का?

HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त अॅल्युमिनियमची नंबर प्लेट असून वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस ती बसवली जाते. प्लेटवर निळ्या रंगाचा क्रोमियम-आधारित अशोकचक्राचा होलोग्राम, विशिष्ट क्रमांक आणि लॉकिंग यंत्रणा असते. याशिवाय वाहनाच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकाची माहिती असलेला स्टिकरही दिला जातो.

चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यास मदत

HSRP नंबर प्लेटमुळे वाहनाची ओळख आणि त्याचा मागोवा घेणे अधिक सोपे होते. नंबर प्लेटच्या माध्यमातून वाहनाची नोंदणी आणि संबंधित माहिती तपासण्यास मदत होते. त्यामुळे वाहन चोरी तसेच चोरीच्या वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरते.

HSRP number plate latest rules in Maharashtra
Congress News: काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी 10 दिवसांचा ‘ट्रेनिंग कॅम्प’; नाशिकमध्ये राहुल गांधींसह दिग्गज नेते करणार मार्गदर्शन

त्यामुळे तुमच्या वाहनावर अजूनही HSRP नंबर प्लेट नसेल, तर अधिकृत प्रक्रियेद्वारे ती बसवून घेणे महत्त्वाचे आहे. परिवहन विभागाच्या तपासणीदरम्यान कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com