Farmer News : मोठा निर्णय: आता घरबसल्या मिळवा शेतीसाठी खत; काळाबाजाराला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारचा 'मास्टरप्लॅन'!

Central government fertilizer decision : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऑनलाइन माध्यमातून शेतीसाठी खत घरबसल्या मिळणार असून खतांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Fertilizer Scheme for Farmers
Fertilizer Scheme for FarmersSarkarnama
Published on
Updated on

Online fertilizer booking for farmers : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना अनेकदा होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन खत बुकिंग करता येणार असून, मोबाईलवरच उपलब्ध खतसाठ्याची माहितीही तपासता येणार आहे.

केंद्र सरकारने यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे विशेष ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रासायनिक खतांची ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे खतासाठी दुकानांमध्ये गर्दी करणे, उपलब्धता तपासण्यासाठी वारंवार फेऱ्या मारणे आणि योग्य वेळी खत मिळेल की नाही, याबाबतची चिंता कमी होण्याची शक्यता आहे.

Fertilizer Scheme for Farmers
Gen Alpha School Election : छत्रपती संभाजीनगरने दिली पहिली महिला मुख्यमंत्री; Gen Alpha ने उधळला गुलाल!

या नव्या ऑनलाइन खत विक्री व्यवस्थेची सुरुवात 15 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर वाशिम जिल्ह्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर भागांमध्येही ही सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खत खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

या ॲपमध्ये जिल्ह्यातील खतसाठ्याची माहिती उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती मोबाईलवरून मिळू शकते. ऑनलाइन बुकिंगमुळे खत वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यास तसेच शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक खत उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, या ॲपची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी वाशिम जिल्ह्यात खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन खत खरेदीची प्रक्रिया समजावी आणि नव्या व्यवस्थेचा सहज वापर करता यावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

Fertilizer Scheme for Farmers
Monsoon Session 2026 : विरोधकांच्या गोंधळात सरकारचा मास्टरस्ट्रोक; पाच महत्वाची विधेयके मंजूर, अधिवेशनाचे सूप वाजले...

वाशिम जिल्ह्यातील प्रायोगिक उपक्रम यशस्वी झाल्यानंतर ही सुविधा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे. त्यामुळे खत खरेदीमध्ये होणारा त्रास कमी होऊन शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचण्यास मदत होऊ शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खरीप हंगामातील खत व्यवस्थापनाला डिजिटल स्वरूप मिळणार असून, शेतकऱ्यांसाठी ही सुविधा किती फायदेशीर ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com