Ashwini Bhide : CM फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, 'मेट्रोवुमन'वर सोपवली मोठी जबाबदारी, प्रशासनात महिलाराज!

Ashwini Bhide principal secretary CM office : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केली आता प्रधान सचिवपदी महिला अधिकाऱ्याच्या नियुक्ती केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ashwini Bhide News : मुख्यमंत्रि‍पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली टीम बांधण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केल्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार होता.

अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर प्रशासनामध्ये महिलाराज आल्याचे दिसते आहे.

Devendra Fadnavis
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी आपल्या पहिल्याच भाषणाने संसद गाजवली! संविधानापासून अदानीपर्यंत सगळेच काढले

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयाचा कार्यभार ब्रिजेश सिंह हे पाहत होते. अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. त्या 1995 च्या बॅचच्या आएएस अधिकारी असून त्यांना 29 वर्षांचा सनदी सेवेतील अनुभव आहे.

आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील 25 वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोच्या जबाबदारीमुळे त्यांना 'मेट्रो वुमन' म्हणून देखील ओळखले जाते. आता त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

अश्विनी भिडे यांचा प्रवास रंजक आहे. त्यांचे शिक्षण तासगाव, कराड, जयसिंगपूर या भागातील मराठी शाळांमध्ये झाले. त्या 1995 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.

त्यांच्या प्रशासकीय कारकीर्द कोल्हापूरमधून सुरू झाली. तेथे त्या सहाय्यक जिल्हाधिकारी होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. मुंबई महानगर विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त, शालेय शिक्षण-क्रिडा विभागाच्या सचिव, राज्यपालांच्या संयुक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.

Devendra Fadnavis
PM Kisan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना बुधवारी धनलाभाचा योग, बँक खात्यात सहा हजार रुपये जमा होणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com