IAS Transfers : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठे फेरबदल; 'महिला-बालविकास'च्या सचिवपदी शैला एस

Atul Patne Shaila A : महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मंत्रालयातील तीन महत्वाच्या विभागाच्या प्रमुखपदी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
IAS Transfer
IAS TransferSarkarnama
Published on: 
Updated on: 

IAS News : महाराष्ट्राच्या प्रशासनातील तीन आयएसएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या विषयी सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केले आहेत. मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांची धुरा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकारी अतुल पाटणे, शैला ए आणि स्वाती योगेश म्हस्के पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

अतुल पाटणे यांची वस्त्रो उद्योगाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी देत सामान्य प्रशासन विभागात प्रशासकीय नावीन्य, उत्कृष्ट आणि सुशासन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.

तर, महिला व बालविकास विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी शैला एस यांच्याकडे देण्यात आली आहे. बदलीपूर्वी त्या सहकार, पणन व वस्त्रोद्योगात सचिव म्हणून कार्यरत होत्या.

IAS स्वाती म्हस्के पाटील यांच्या पदस्थापनेच्या आदेशात अंशत: बदल करण्यात आले असून सामन्य प्रशासन विभागात सचिव ( प्रशासकीय नावीन, उत्कृष्टता आणि सुशासन) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यभार तत्काळ स्वीकारणच्या आदेश

महिला व बालविभाग विभाग, सामन्य प्रशासन विभाग तसेच वस्त्रोउद्योग या मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांच्या प्रमुखपदाची जबाबदारीमध्ये बदल करण्यात आले आहे. बदलीचे आदेशात तत्काळ कार्यभार सांभाळण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन नेतृत्वात आता या विभागांचे कामकाज सुरु होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.