Fact Check : IAS तुकाराम मुंढेंच्या 'निवृत्तीबाबत' बातम्या कितपत खऱ्या? सोशल मीडियामधील चर्चांमध्ये किती तथ्य?

IAS Officer Tukaram Mundhe : आपल्या बेधडक कारवाईने चर्चेत असणारे राज्याचे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित 'इन्स्टाग्राम'वरील एका पोस्टमुळे सोशल मीडियासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
IAS Officer Tukaram Mundhe
IAS Officer Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on

IAS Tukaram Mundhe Instagram Post News : वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचा कार्यभार घेतल्यापासून राज्यात भेसळ माफिया, गुटखा माफिया आणि हॉटेल चालकांसह टपरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

अशातच तुकाराम मुंढे यांच्या निवृत्तीसंबंधात एक बातमी व्हायरल होत आहे. एक लाख 26 हजार फॉलोअर्स असलेल्या tukarammundeunofficial या पेजवरती 'मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!" तुकाराम मुंढे यांच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा अशा आशयाचे कार्ड पोस्ट करण्यात आले आहे.

एका वृत्तपत्राचा संदर्भ देऊन हे कार्ड पोस्ट करण्यात आले आहे. या वृत्तपत्राच्या वेबसाईटवरही यासंबंधित बातमी प्रकाशित झाली आहे. या बातमीच्या सोर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता tukaram_ias या तब्बल 8 लाख 40 हजार फॉलोअर्स असलेल्या पेजवरती 23 मे रोजी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. If i cannot, who else can? असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

या व्हिडीओचा आणि कॅप्शनचा संदर्भ देऊन तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित बातमी करण्यात आली आहे. पण तुकाराम मुंढे यांनी असे अधिकृतपणे कुठेही 'निवृत्तीबाबत' विधान केल्याचे आढळत नाही. शिवाय या चर्चांवर तुकाराम मुंढे यांनीही कुठेही, कधीही अधिकृतपणे भाष्य केलेले आढळून आलेले नाही.

तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी आहे. त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. या मोहिमेमुळे राजकीय नेत्यांकडूनही त्यांच्या बदलीबाबत भाष्य होत आहे. अशात त्यांच्या निवृत्तीबाबत बातमी आल्याने खळबळ उडाली होती. मात्र तुकाराम मुंढे यांनी निवृत्तीबाबत भाष्य केल्याचे कुठेही आढळून येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com