NCP on Delhi Election : इंडिया आघाडी असती तर..! शरद पवारांच्या नेत्यानं सांगितलं 'आप'च्या पराभवाचं कारण

NCP on Delhi Election 2025 : मागील दोन निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने प्रचंड असं बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा भाजप दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मागील दोन निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने प्रचंड असं बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती.

मागील निवडणुकीमध्ये तब्बल 60 जागांवर विजय मिळवणारी आम आदमी पार्टी यंदा फक्त पंचवीस जागांच्या जवळ पोहोचली आहे. या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमध्ये असलेले आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढले याचा फटका दिल्ली निवडणुकीमध्ये बसला असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील अजून इंडिया आघाडीतील पक्षांनी एकमेका विरोधात लढावं असा खोचक टोला लगावला आहे.

Rohit Pawar
Delhi Election result 2025 : वर्तुळ पूर्ण! काँग्रेससोबत जे केले, फिरून तेच अरविंद केजरीवालांच्या पुढ्यात आले...

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील दिल्ली निवडणुकीबाबत प्रतिक्रिया आली आहे. दिल्ली निवडणुकी इंडिया आघाडी म्हणून लढली असती तर भाजपला 20 देखील जागा जिंकते आल्या नसत्या असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन!

१५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती.

Rohit Pawar
Delhi Election result : भाजप जिंकल्याने दिल्लीकरांची होणार चांदी; असा होणार फायदा

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी. असं रोहित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com