Ambadas Danve On Bawankule : मणिपूरमुळे तुमचा उद्धार जगभर, दानवेंनी बावनकुळेंना सुनावले..

Shivsena UBT : माणिपूरच्या भूमीवरची हिंसा अद्याप थांबलेली नाही बावनकुळेजी.
Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News
Ambadas Danve- Chandrashekar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये सातत्याने सोशल मिडिया वाॅर सुरू असते. मुंबईमध्ये भाजपविरोधी `इंडिया`, आघाडीच्या बैठकीने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. (Shivsena News) `इंडिया`ची देशभर हवा होत असल्याने भाजपने आता या नव्या आघाडीच्या विरोधात दंड थोटपले आहे.

Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News
Sharad Pawar On India Meeting: 'इंडिया' च्या दोन दिवसांच्या बैठकीत काय चर्चा होणार ? शरद पवारांनी थेट अजेंडाच सांगितला

२८ पक्षांची `इंडिया`, आघाडी म्हणजे जगभरात नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी एकत्बर आलेली श्वापदांची टोळी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी केली होती. या टीकेला ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून प्रत्युत्तर दिले आहे.

या संदर्भात ट्विट करत दानवे यांनी बावनकुळे यांना सुनावले. माणिपूरच्या भूमीवरची हिंसा अद्याप थांबलेली नाही बावनकुळेजी. (Shivsena) कालच दोन जणांचे बळी गेल्याचे वृत्त आपल्या माहितीस्तव पाठवत आहे. बदनामी विरोधकांच्या बैठकीने नाही तर निर्दोष लोकांच्या मृत्यूने होत असते. (Maharashtra) माणिपूरमुळे तुमचा 'उद्धार' जगभर आणि देशांतर्गत सुरूच आहे, असा टोला दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

तत्पुर्वी बावनकुळे यांनी मुंबईत दोन दिवस होणाऱ्या `इंडिया`च्या बैठकीवर टीका केली होती. मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर `घमेंडिया`ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही `गरूड झेप` म्हणत आहात ती गरुड झेप नाही. नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या `नरड्यावर बसण्याचं स्वप्न` बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे व इंडियाच्या नेत्यांवर हल्ला चढवला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com