

IRS Sachin Mote : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी सचिन मोटे अडचणीत आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोटे यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. बावनकुळे यांनी कोकण विभागीय आयुक्तांना डीडीएसआर ग्रुपची तातडीने चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.
आमदार पडळकर यांनी गुरुवारी भाजप पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी डीडीएसआर ग्रुपच्या अंतर्गत सचिन मोटे या शासकीय अधिकाऱ्याने आपल्या नातलगांच्या नावावर अनेक कंपन्या नोंदवल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात जवळपास 20 इमारत बांधकाम प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे.
आपल्या पदाचा गैरफायदा घेत, नियमांचे उल्लंघन करत फ्लॅट बुक केलेल्या शेकडो नागरिकांची फसवणूक केली, यासंदर्भात बुधवारी विधिमंडळातही पडळकर यांनी मुद्दा मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली होती, असे पडळकर यांनी सांगितले होते.
डीडीएसआर ग्रुपने गुंतवणूकदारांना दामदुप्पट करून देतो असे लालूच दाखवत हजारो कोटी रुपये गोळा केले. त्या पैशांतून इमारत निर्माणासाठी नवी मुंबईत अनेक प्लॉट्स विकत घेतले. जीएसटी, स्टॅम्प ड्यूटीतून सूट मिळवण्यासाठी सोसायट्या बनवल्या. त्यातून सरकारचा महसूल बुडविला. शिवाय गौण खणिजच्या माध्यमातून सरकारची रॉयल्टीही बुडविली, असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो सामान्य लोकांनी डीडीएसआरच्या गृहनिर्माण प्रकल्पांत फ्लॅट बुकिंग केले, त्यांचीही फसवणूक करण्यात आली आहे. 20 इमारत निर्माणाच्या माध्यमातून 2 हजार कोटींची फसवणूक झाली आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे, अशीही मागणी यावेळी पडळकर यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.