Rupali Chakankar: खरात प्रकरणावर बोलताना अंधारेंनी अचानक घेतलं संगीतकार अनू मलिकांचं नाव, चाकणकरांवर केले गंभीर आरोप; म्हणाल्या, सोहम चाकणकर...

Sushma Andhare : अशोक खरात प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत पोलीस रेकॉर्डवर रुपाली चाकणकर यांचं नाव अद्याप का येत नाही? असा सवाल केला आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. अंधारेंनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणात ज्या ज्या मंत्र्यांचे फोटो समोर आले आहेत, त्यांच्यावरही आरोप केले. त्याचबरोबर याप्रकरणात नाव आलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यक्तीचे सीडीआर अर्थात कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची त्यांनी जोरदार मागणी केली.

कारण यामुळं अनेक खुलासे होणार आहेत असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, याप्रकरणात बोलत असताना अंधारे यांनी अचानक संगितकार अनु मलिक यांचं नाव घेतलं आणि चाकणकरांवर गंभीर आरोप केले. तसंच रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकरचा मलिकांशी काय संबंध आहे? याचा दाखला दिला.

Sushma Andhare
Sambhaji Nagar: अखेर संभाजीनगरच्या नागरिकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल संदर्भातील 'तो' महत्वाचा निर्णय घेतला मागे

अंधारे म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणात जी नावं समोर येत आहेत त्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत. कारण यामध्ये बरीच कट-कारस्थानं झाली आहेत. हे सीडीआर का तपासले जावेत यासाठी कारण म्हणून एक घटना सांगते. संगितकार अनु मलिक यांच्यावर चित्रपटसृष्टीतील दोन ते तीन बायकांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. ज्यावेळी हे आरोप झाले तेव्हा देशात 'Me Too' ही मोहीम जोरदार सुरु होती. त्यावेळी रुपाली चाकणकर याच राज्य महिला आोयगाच्या अध्यक्षपदी होत्या. अनु मलिक यासंदर्भातील महिलांच्या लैंगिक छळाची तक्रार त्यावेळी रुपाली चाकणकर यांच्याकडं आली. तेव्हा चाकणकरांनी अनु मलिक यांना क्लीनचीट दिली होती. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? तर यामध्ये विशेष हे आहे की, नंतर अनु मलिक यांच्या प्रॉडक्शनचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं होतं.

Sushma Andhare
Mission Madha : पालकमंत्री गोरेंचे ‘मिशन माढा’; झेडपीची 3 सभापतिपदे नेली लोकसभा मतदारसंघात!

म्हणजे जर रुपाली चाकणकर महिलांना न्याय देण्याऐवजी लैंगिक छळाच्या केसेस जर अशा प्रकारे डील करत असतील तर हे वाईट आहे. या सगळ्यांमध्ये चित्रपटाच्या एका कार्यक्रमात सोहम चाकणकर, रुपाली चाकणकर आणि अनु मलिक हे सगळेच लोक तुम्हाला एकाच फोटोमध्ये दिसतील. त्यामुळेच रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगावर असताना कशा पद्धतीनं काम केलं, याबाबतच्या या एवढ्या सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर यांचं नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही? हा प्रश्न फक्त एका महिलेचा नाही. पण केवळ एकाच महिलेमुळं जर शोषण होत असेल तर मात्र ते वाईट आहे त्यावर बोललं पाहिजे, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

Sushma Andhare
Dhananjay Munde News : जन्मला आलो तसा संघर्ष, जन्मलो पण चार महिने डोळे उघडले नाही, जन्मताच लिव्हरचा त्रास, पण तुमच्या आशीर्वादाने जगतोय!

दरम्यान, या सगळ्या संदर्भानं असणारे जे इनपूट आहेत ते आम्ही एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडं दिले आहेत. यामध्ये सातपुते यांनी त्यांच्या काही अडचणीही सांगितल्या आहेत, कारण प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे. कारण सगळ्या गोष्टी करताना त्यांना हे सगळं जिकरीचं होत आहे, पण तरीही सत्य बाहेर येणं गरजेचं असल्यानं रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, याचा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com