मलिकांच्या टि्वटनंतर 'मुंबई रिव्हर अँथम'मधून जयदीप राणाला वगळलं?

नवाब मलिकांच्या (Nawab Malik)आरोपानंतर आता युट्यूबवर आपण 'मुंबई रिव्हर अँथम' (Mumbai River Anthem) हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला व्हिडिओच्या श्रेयनामावलीमध्ये जयदीप राणा यांचे नाव काढून टाकल्याचे दिसते.

मलिकांच्या टि्वटनंतर 'मुंबई रिव्हर अँथम'मधून जयदीप राणाला वगळलं?
sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद देऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

अमृता फडणवीस (amrita fadnavis) यांच्यावर 'मुंबई रिव्हर अँथम' या व्हिडिओ चित्रीत केला आहे. यात नदी स्वच्छता मोहिमेवर अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं होते. या गाण्याचा फायनान्स हेड हा जयदीप राणा (jaideep rana) असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितलं होते. मलिक यांनी टि्वट करीत याचा पुरावा दिला होता.

नवाब मलिकांच्या (Nawab Malik)आरोपानंतर आता युट्यूबवर आपण 'मुंबई रिव्हर अँथम' (Mumbai River Anthem) हा व्हिडिओ आपण पाहिला तर आपल्याला व्हिडिओच्या श्रेयनामावलीमध्ये जयदीप राणा यांचे नाव काढून टाकल्याचे दिसते. कारण सकाळी मलिक यांनी जे टि्वट केलं आहे. यात जयदीप राणाचं नाव होतं, हे नाव अचानक का गायब झाले याची चर्चा सध्या सुरु आहे.


मलिकांच्या टि्वटनंतर 'मुंबई रिव्हर अँथम'मधून जयदीप राणाला वगळलं?
मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध ; दिवाळीनंतर पवारांना पुरावे देणार ; फडणवीसांचा 'बॉम्ब'

फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा (Jaydeep Rana) असं या व्यक्तीचे नाव आहे. निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनीही हा फोटो ट्विट केला आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

जयदीप राणा साबरमती तुरूंगात आहे. ड्रग्जच्या प्रकरणात त्याला अटक कऱण्यात आली. त्याचे संबंध फडणवीस यांच्याशीही आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नींनी नदीवर एक गाणं तयार केले होते. त्यात सोनू निगम व अमृता यांनी गाणं गायलं होतं. त्यात फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. त्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होता, असे मलिक यांनी सांगितले.

फडणवीसांनी मलिकांच्या आरोपांचे खंडन केलं आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, दिवाळीची सुरवात मलिकांनी (Nawab Malik)लवंगी फटाक्यांनी केली आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मी काचेच्या घराच राहत नाही. दिवाळी संपण्याची वाट पाहा. अंडरवर्ल्डशीसोबत मलिकांचे असलेल्या संबधांचे पुरावे मी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहे. मलिक यांनी आज टि्वट केलेला फोटो चार वर्षापूर्वीचा आहे. त्याचे माझ्यासोबतही फोटो आहेत, पण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो टि्वट केला आहे. मलिक यांच्या जावायाकडे ड्रग्ज सापडले, तर सर्वच राष्ट्रवादी ड्रग्ज माफीया आहे का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com