Tanaji Sawant Warns: माझा नाद नाय करायचा! थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो; तानाजी सावंतांचा बंडखोर उमेदवाराला दम

Dharashiv ZP Election Tanaji Sawant Warns Rebel Candidate: धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत विरोधकांवर तुटून पडले. रस्त्याच्या दुरावस्थेवरून त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Tanaji Sawant Warns Rebel Candidate in Dharashiv ZP Election: शिवसेनेचे नेते, राज्याचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत आपल्या विधानामुळे अनेकवेळा वादात सापडतात. आता अशाच एका विधानावरुन ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांनी एका बंडखोर उमेदवाराला जाहीर सभेत थेट दम भरला. आपलाच जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत आक्रमक झाले.

थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो, महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही,” अशा शब्दात सावंतांनी बंडखोर उमेदवाराला दम दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत सावंत यांनी विरोधी उमेदवारांचा सडेतोड समाचार घेतला.

धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत विरोधकांवर तुटून पडले. रस्त्याच्या दुरावस्थेवरून त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.सभेला जात असताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून सावंत संतापले. "जनतेला वेठीस धरू नका," असा इशारा त्यांनी दिला.

Tanaji Sawant
Sharad Pawar Statement: अजितदादांच्या स्मारकाबाबत शरद पवार म्हणाले, "ज्या जागेची चर्चा केली, त्या संस्थेचा मी..."

काय म्हणाले तानाजी सावंत

"माझा नाद करायचा नाही. मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे. आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. मी रस्त्यावरून आलो. तो रस्ता विरोधक आपणच केल्याचा दावा विरोधक करीत आहेत. तुझ्या बापानं निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे, निधी मी आणला. थांब आता तुझी चौकशीच लावतो, अशी धमकी सावंत यांनी बंडखोर उमेदवाराला दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com